Palak Tiwari Latest Photoshoot: हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीची लाडकी लेक पलक अशा स्टार किड्स मधली एक आहे, जे नेहमीच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असतात. पलकच्या अभिनयापेक्षा तिच्या व्हीडियो आणि फोटोंचीच सर्वाधिक चर्चा सोशल मिडियावर जास्त होत असते. Palak Tiwari Fans became Crazy to her new look
नुकताच तिचा एक नवा व्हीडियो इंटररनेटवर व्हायरल होत आहे, या व्हीडियोमाधील तिच्या नखरेल अंदाजावर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
अधिक वाचा : ED, CBI Raid in Beed: बीडमधील शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयचे छापे
पलक तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने लेहेंगा चोली घातलेली दिसत असून, तिने गोल्डन कलरचा डीप नेक ब्लाउज परिधान केला आहे. यासोबत पलकने पांढऱ्या रंगाचा नक्षीदार लेहेंगा घातला आहे. पलकने यावर कोणताही स्कार्फ कॅरी केलेला दिसून येत नसून तिने तिचे केसदेखील मोकळे सोडले आहेत, तिच्या या गेट अपवर तिने केलेल्या हलका मेकअपने तिला आणखीनच हॉट बनवले आहे. पलकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अधिक वाचा : कोकणवासियांसाठी खुशखबर !, बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा एक्सप्रेसचे काम डिसेंबरपर्यत होणार पूर्ण
पलक तिवारी सध्या तिच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या या चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. 'किसी का भाई किसी की जान'मध्ये व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे.