Panchayat 2 : मुंबई : ऐन कोरोना काळात पंचायत या वेबसीरीज पहिला सीजन ऍमेझॉन प्राईमवर रीलीज झाला होता. पहिला सीजन प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. त्यानंतर पंचायतचा दुसरा सीजन येणार की नाही याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम होता. तसेच निर्मात्यांनाही याबद्दल स्पष्ट सांगितले नव्हते. आता ऍमेझॉनने काही दिवसांपूर्वी धडाधड अनेक सीरीज आणि चित्रपटांची घोषणा केली आणि प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. पंचायतचा दुसरा सीजन येणार हे खुद्द ऍमेझॉनने जाहीर केले आहे. (Panchayat 2 season will release on 20th may on amazon prime)
intezaar hua khatam kyunki panchayat jald hogi aarambh! 🎬 #PanchayatOnPrime, new season May 20@TheViralFever @ArunabhKumar @StephenPoppins #ChandanKumar @uncle_sherry @vijaykoshy @Farjigulzar #RaghubirYadav @Neenagupta001 #ChandanRoy @malikfeb #Sanvikaa #SunitaRajwar pic.twitter.com/Ef8Dtam4oP
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) May 2, 2022
भारतीय वेबसीरीजमध्ये मोठ्या प्रमाणात शिव्या, अश्लील सीन, हिंसा भरून असतात. परंतु पंचायत ही सीरीज यापेक्षा वेगळी ठरली. एक शहरी तरुण ग्रामीण भागात स्थायिक होतो आणि गावचा कारभार पाहतो असेच चित्रण या वेबसीरीजमध्ये करण्यात आले आहे. मुख्य भूमिकेत जितेंद्र कुमार तर नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैझल मलिक, पूजा सिंह यांच्या भूमिका गाजल्या.
Ek baar phir Abhishek ke sath Phulera ke anubhav mein jud jaiye!🥳 pic.twitter.com/Slq83xRziR
— The Viral Fever (@TheViralFever) May 2, 2022
आता नवीन सीरीजमध्ये जितु गावच्या प्रेमात पडणार का? गावच्या विकासात जितुची आणखी थेट भूमिका असणार का तसेच आणखी कुठले प्रश्न निर्माण होणार का या प्रश्नांची उत्तरे २० मे ला मिळणार आहे. २० मे रोजी पंचायतचा दुसरी सीजन प्रदर्शित होणार आहे. ऍमेझॉनने याची अधिकृत घोषणाही केली आहे.
Producer: @ArunabhKumar
— The Viral Fever (@TheViralFever) May 2, 2022
Director: @StephenPoppins
Writer: #ChandanKumar
@uncle_sherry @vijaykoshy @Farjigulzar #RaghubirYadav @Neenagupta001 #ChandanRoy @malikfeb #Sanvikaa #SunitaRajwar #PanchayatOnPrime #PrimeVideoPresentsIndia #SeeWhereItTakesYou