Atal Bihari Vajpayee Biopic: अटल बिहारी वाजपेयींच्या बायोपिकमध्ये 'हा'अभिनेता साकारणार अटलजींची व्यक्तीरेखा, रवी जाधवचं दिग्दर्शन

झगमगाट
Updated Nov 18, 2022 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pankaj Tripathi in Atal Bihari Vajpayee Biopic: भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकची (Atal Bihari Vajpayee Biopic) घोषणा 23 जून रोजी करण्यात आली होती. आता या सिनेमाची स्टारकास्टही जाहीर करण्यात आली आहे. बॉलिवूडचा जबरदस्त अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) या सिनेमात अटल बिहारी वाजपेयींची व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर रवी जाधव सिनेमाचं दिग्दर्शक आहेत.

Pankaj Tripathi in Atal Bihari Vajpayee Biopic ravi jadhav direction
पंकज त्रिपाठी अटलजींच्या व्यक्तीरेखा साकारणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित सिनेमात पंकज त्रिपाठी अटलजींची व्यक्तीरेखा साकारणार
  • मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
  • 2023 च्या डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे

Pankaj Tripathi in Atal Bihari Vajpayee Biopic:भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)  यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, आणि म्हणून दिग्दर्शक रवी जाधव वाजपेयींच्या जीवनावर (Atal Bihari Vajpayee Biopic)  सिनेमा बनवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात वाजपेयींची व्यक्तीरेखा अभिनेता पंकज त्रिपाठी  (Pankaj Tripathi) साकारणार आहे. पंकज पंकज त्रिपाठीला अटलजींच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दिग्दर्शक रवी जाधवला  'द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटीशियन अँड पॅराडॉक्स' या त्यांच्या पुस्तकावर सिनेमा आणायचा आहे, आणि आता अटलजींची ही व्यक्तीरेखा सिल्व्हर स्क्रीनवर साकारण्याची जबाबदारी पंकज त्रिपाठी यांच्याकडे देण्यात आली आहे.  


‘मैं रहूं या ना रहूं ये देश रहना चाहिए’

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक 'मैं राहून या ना राहून ये देश रहना चाहिये - अटल' या बायोपिकीची घोषणा 23 जूनलाच करण्यात आली होती. मात्र, सिनेमाची स्टारकास्ट ठरलेली नव्हती. अटलजींची भूमिका साकारण्यासाठी दिग्दर्शक तेवढ्याच ताकदीच्या एका सशक्त अभिनेत्याच्या शोधात होता. अखेर आता निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकाने अटलजींच्या भूमिकेसाठी अभिनेता पंकज त्रिपाठी यांची निवड केली आहे. त्यामुळे अटलजींवरील बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयींच्या व्यक्तीरेखेत दिसणार आहे. अटलजींची व्यक्तीरेखा साकारायची म्हणजे हिंदी भाषेवरचं प्रभुत्व हा सर्वात महत्त्वाचा निकष होता. त्यामुळे पंकज त्रिपाठी अटलजींच्या व्यक्तीरेखेसाठी एकदम परफेक्ट असल्याचं त्यांच्या चाहत्यांचं म्हणण आहे. 

 

अधिक वाचा : 'दृश्यम 2' पायरसी साइटवर लीक


"ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे"

"माणुसकी जपणाऱ्या या राजकारण्याची भूमिका सिल्व्हर स्क्रीनवर साकारणं माझ्यासाठी मोठा सन्मान आहे", अशी भावना अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केली. सिनेमाच्या स्टारकास्टच्या घोषणेच्या निमित्ताने त्यांनी आपलं मत मांडलं. पंकज त्रिपाठी पुढे असंही म्हणाले, "अटलजी राजकारणी असण्यासोबतच एक अप्रतिम लेखक आणि कवीही होते. माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी त्यांची व्यक्तीरेखा साकारणे हा खूप मोठा बहुमान आहे." हिंदी भाषेवर असलेलं अटलजींचं प्रभुत्व साऱ्यांनाच ठाऊक आहे.त्यामुळे त्यांच्यासारख्या राजकारण्याची व्यक्तीरेखा साकारणं आव्हानात्मक असल्याचंही पंकज त्रिपाठी यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा : वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर व्हा सावध...


या दिवशी रिलीज होणार सिनेमा


सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाच्या रिलीजबाबत काही ठोस माहिती दिलेली नाही. मात्र, पुढील वर्षी ख्रिसमसपर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक रवी जाधव अटल बिहारी वाजपेयींवर आधारित या बायोपिकचं दिग्दर्शन करत आहे. त्यामुळे सिनेमात काहीतरी खास असणार हे सूज्ञ प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी