The Kashmir Files मध्ये चिन्मय मांडलेकरांचा अंगावर काटा आणणारा सीन, बिट्टा कराटेच्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

The Kashmir Files Real Incident Video Viral : विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरमध्ये 1990 मध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाचे धक्कादायक चित्रण केले आहे. या चित्रपटातील सीन पाहून थिएटरमध्ये लोकांना अक्षरशः रडू कोसळत आहे.

People cried after watching Chinmay Mandlekar's performance in The Kashmir Files, the original video of Bitta Karate, the killer of 20 people, went viral.
The Kashmir Files मधला चिन्मय मांडलेकरांचा अभिनय पाहून लोक रडले, बिट्टा कराटेच्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटात 1990 मध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाची कथा
  • काश्मीरच्या तीन दशकांहून अधिक जुन्या फाईलची पाने उलटली आहेत.
  • दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना अस्वस्थ करतो.

मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या 'द कश्मीर फाईल्स' असं करून दाखवलं जे कुणीही कल्पनाही केली नव्हती. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची आणि क्रूरतेची कहाणी पाहून प्रत्येकाला भावूक केले आहे. या चित्रपटातील मराठमोळ्या चिन्मय मांडलेकर, पल्लवी जोशी या कलाकारांनी काश्मिरी पंडितांच्या व्यथा पडद्यावर ज्याप्रकारे दाखवल्या आहेत, ते पाहून हृदय पिळवटून जाते. (People cried after watching Chinmay Mandlekar's performance in The Kashmir Files, the original video of Bitta Karate, the killer of 20 people, went viral.)

अधिक वाचा : Ranbeer Kapoor : रणबीर कपूरने दिली दीपिका पदुकोणच्या पॉटशॉट्सवर प्रतिक्रिया , 'तिच्यासाठी हे अधिक योग्य असते.'

'द काश्मीर फाईल्स'मध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या कलाकारांची टीम यामध्ये आहेत. या चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी वास्तविक घटनांवर आधारित आहेत आणि ती पाहिल्यानंतर प्रत्येकाचे हृदय हेलावून जाईल. 'द काश्मीर फाइल्स'मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा दहशतवादी बिट्टा कराटेची मुलाखतही आहे. हा तोच बिट्टा कराटे आहे जो बिना नकाब रस्त्यावर उतरतो आणि बंदुकीने लोकांना मारतो. कथेचा खलनायक म्हणून अभिनेता चिन्मय मांडलेकरने बिट्टाची भूमिका केली आहे. त्याने आपल्या अभियनाने व्यक्तिरेखा एका उंचीवर नेली आहे, जो चित्रपटाचा सर्वोत्तम भाग ठरू शकतो.

बिट्टा कराटेचा खरा व्हिडिओ

चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बिट्टा कराटेने २० लोकांची हत्या केल्याची कबुली देतानाही दाखवले आहे, ज्यापैकी काही काश्मिरी पंडित होते. व्हिडीओमध्ये बिट्टा कराटे सांगत आहे की, त्याला मारताना कसे वाटले. त्याने सांगितले की, पहिल्या हत्येनंतर त्याला काहीतरी विचित्र वाटले पण नंतर सर्वकाही ठीक वाटले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी