Ranveer Singh: न्यूड फोटशूटनी वाढवल्या रणवीर सिंगच्या अडचणी, न्यायालयात याचिका दाखल

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 09, 2022 | 17:13 IST

Ranveer Singh Nude Photoshoot: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Bollywood actor Ranveer Singh) सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक शहरांमध्ये त्याच्याविरोधात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या.

Ranveer Singh
रणवीर सिंग 
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Bollywood actor Ranveer Singh) सध्या चांगलाच चर्चेत आहे.
  • रणवीरला त्याला सोशल मीडियावर (social media) प्रचंड ट्रोल केले गेले आणि मीम्स बनवले गेले.
  • अनेक शहरांमध्ये त्याच्याविरोधात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या.

मुंबई: Ranveer Singh's nude photoshoot sparks controversy:  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Bollywood actor Ranveer Singh) सध्या चांगलाच चर्चेत आहे. न्यूड फोटोशूट (nude photoshoot) केल्यापासून एकामागोमाग एक त्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सुरुवातीला जिथे त्याला सोशल मीडियावर (social media) प्रचंड ट्रोल केले गेले आणि मीम्स बनवले गेले, त्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याच्याविरोधात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या. आता याच क्रमाने त्याच्या विरोधात कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

रणवीरविरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका (Public Interest Litigation,PIL)

न्यूड फोटोशूट केल्यामुळे सतत चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग याच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने पश्चिम बंगाल सरकार आणि या प्रकरणाशी संबंधित इतर सर्व प्राधिकरणांना रणवीर सिंगचे फोटोशूट असलेल्या मॅगझीनच्या सर्व प्रिंटेड कॉपी जप्त करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

अधिक वाचा-  दह्याचे आश्चर्यकारक फायदे, चेहऱ्यावर लावल्यास 'या' समस्या होतील दूर

वकील काय म्हणाले 

वकील नाझिया इलाही खान यांनी रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांच्या मोठ्या वर्गानं दिलेल्या मतांच्या आधारावर हे न्यूड फोटो अश्लील असल्याचं म्हटलं आहे. रणवीर सिंगचे पश्चिम बंगालमधील फोटोशूट नागरिकांचं मन मोठ्या प्रमाणावर चुकीच्या दिशेनं जात आहे, विशेषत: अल्पवयीन मुलांसाठी, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

Ranveer Singh

रणवीर सिंगविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

रणवीर विरोधात एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये (Chembur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरनं न्यूड फोटोशूट करून भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले असून महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप (Mumbai Police) करण्यात आला आहे. रणवीरविरोधात भादंवि कलम 67 A, कमल 292, 293, 354 आणि 509 नुसार भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. रणवीरने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले असून त्याने महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. आपला देश हा संस्कृतीचं जतन, पूजा करणारा देश आहे. यानंतर मुंबई पोलिसांनीही रणवीरविरोधात एफआयआर नोंदवला.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी