PS-2 Trailer Release ऐश्वर्या राय, कार्ती आणि चियान विक्रम स्टारर 'पोनियिन सेल्वन 2' चा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून सिनेरसिक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता PS-2 काही आठवड्यांत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे, PS-2 च्या निर्मात्यांनी नुकताच या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
चोल साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा खंड आता दुसऱ्या भागात म्हणजेच 'पोनियिन सेल्वन भाग २' मध्ये पुढे पाहायला मिळणार आहे. या दुसऱ्या भागाचा ट्रेलर खरोखरच अद्भुत आहे. प्रत्येक सीन तयार करण्यासाठी आणि पडद्यावर जिवंत करण्यासाठी किती मेहनत घेतली असेल हे या ट्रेलरमधून दिसून येते.
ट्रेलरची सुरुवात सिंहासनाच्या नव्या उत्तराधिकारीच्या घोषणेने होते. अरुण मोडी समुद्र लीन झाले असून आता सिंहासनाचे पुढील उत्तराधिकारी मधूरांकतन देव असतील असे म्हंटले जाते. यानंतर सिंहासन आणि जमिनीच्या वाटणीचा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडते. विक्रम उर्फ आदित्य करिकालन सूड घेण्यासाठी निघतो.
अधिक वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या पोलीस बॉडीगार्डची आत्महत्या
पोन्नियिन सेल्वन 2 च्या ट्रेलरमध्ये राजकुमारी नंदिनी म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन तलवार चालवताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि भाव तिच्या चाहत्यांना थक्क करून सोडते. नंदिनीने चोल साम्राज्याचा अंत करण्याचे व्रत घेतले होते आणि दुसऱ्या भागात ती तेच व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी सिंहासनासाठी चोल राज्यात तांडव होणार हे ट्रेलर पाहूनच स्पष्ट होत आहे. पण हे महायुद्ध पुढे काय स्वरूप धारण करेल, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. मात्र 'पोनियिन सेल्वन 2' मधील सिंहासनाची ही लढाई शिगेला पोहोचणार, हे मात्र नक्की !
या लढाईत कोणाला नुकसान होणार आणि कोणाला फायदा होणार? नंदिनी आणि आदित्यचे पुढे काय होणार? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
'पोनियिन सेल्वन 2' च्या या धमाकेदार ट्रेलरमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मणिरत्नम दिग्दर्शित, या चित्रपटात ऐश्वर्या, कार्ती आणि विक्रम यांच्यासह शोभिता धुलिपाला, जयम रवी, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी आणि प्रकाश राज हे कलाकार या भागात ही झळकणार आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रत्येक चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांबरोबरच तो हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.
अधिक वाचा : 70 वर्षांनंतर देशात चित्ताचा जन्म, कुनोत कुस उजवली
हे सर्वश्रुत आहे की, चोल साम्राज्य हे भारतातील एकमेव बलाढ्य साम्राज्य होते, ज्याने सुमारे 1500 वर्षे देशावर राज्य केले होते. चोल सम्राज्याची ही महागाथा मणिरत्नम यांनी आपल्या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट 'कल्की' या कादंबरीवर आधारित आहे.