Dharmaveer Trailer मुंबई : नुकतंच शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. ट्रेलर रीलीज झाल्यापासून आनंद दिघे यांची भूमिका साकारणार्या प्रसाद ओकचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांचा लूक जसाच्या तसा साकारल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे.
आनंद दिघे यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा झाली होती. त्याचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला अवघ्या तासांत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. आनंद दिघे शिवसेनेचे तडफदार नेते होते. ठाण्यात शिवसेना रुजवण्याचे श्रेय हे आनंद दिघे यांचे आहे. २००१ साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रवीण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून प्रसाद ओक यांनी या आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.