दिराच्या लग्नात प्रियंकाचा असा होता अंदाज

झगमगाट
Updated Jun 30, 2019 | 11:12 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोपडा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती कधी तिच्या सिनेमामुळे तर कधी तिच्या फॅशन सेन्समुळे ती चर्चेत असते. प्रियंका सध्या आपला दीर जो जोनासच्या लग्नामध्ये व्यस्त आहे.

priyanka chopra
प्रियंका चोपडा  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियंकाने केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे तर आपल्या फॅशन सेन्सनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सध्या आपला दीर जो जोनास आणि सोफी टर्नरच्या लग्नामध्ये व्यस्त आहे. ती सध्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. 

प्रियंका चोपडा सध्या फ्रान्समध्ये अमेरिकन अभिनेत्री सोफी टर्नर आणि दीर जो जोनासच्या लग्नाचे समारंभ एन्जॉय करत आहे. प्रियंकाचा दीर अर्थात निक जोनासचा भाऊ जो जोनासने पत्नी सोफी टर्नरसोबत पुन्हा लग्न केले आहे. या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here they all are#priyankachopra #nickjonas #kevinjonas #joejonas #sophieturner

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

She wore a sari the wedding ✨ #priyankachopra #nickjonas

A post shared by Priyanka-Chopra.us (@priyankacentral) on

विशेष म्हणजे लग्न जरी जो जोनास आणि सोफी टर्नर यांचे असले तरी प्रियंका सध्या लाईमलाईटमध्ये आहे. लग्नामधील तिचा अंदाज पाहून साऱ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. प्रियंका या लग्नात वेस्टर्न आऊटफिट नव्हे तर इंडियन आऊटफिटमध्ये दिसली. तिने साडी नेसली होती. ३६ वर्षीय अभिनेत्रीने गुलाबी रंगाची फ्लोरल साडी नेसली होती. यासोबतच तिने स्लिव्हलेस ब्लाऊज कॅरी केला होता. हेअरस्टाईलबाबत बोलायचे झाल्यास तर तिने केसांना बांधले होते. केसांमध्ये तिने गुलाबही लावले होते. ही साडी सब्यसाचीने डिझाईन केली होती. या आऊटफिटसोबत तिने डायमंड इअररिंग्स आणि गोल्ड वॉच कॅरी केले होते. तिने गोल्ड आणि न्यूड मेकअप केला होता. तर निक जोनास काळ्या रंगाच्या सूटमध्ये अतिशय हँडसम दिसत होता. 

त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कामाच्या बाबत बोलायचे झाल्यास अभिनेत्री प्रियंका लवकरच बॉलिवूड सिनेमा द स्काय इज पिंकमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शोनाली बोस करत आहेत. सिनेमात प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम, रोहित शरफ सोबत दिसणार आहे. तिचा हा सिनेमा स्पीकर आयशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे.

कधी ट्रोल तर कधी प्रशंसा

प्रियंका चोपडाची सोशल मीडियावर नेहमी चर्चा सुरू असते. ती कधी सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल होत असते तर कधी चाहते तिची स्तुती करत असतात. प्रियंकावर तर सोशल मीडियावर मीम्सही तयार करण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिराच्या लग्नात प्रियंकाचा असा होता अंदाज Description: ग्लोबल आयकॉन प्रियंका चोपडा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती कधी तिच्या सिनेमामुळे तर कधी तिच्या फॅशन सेन्समुळे ती चर्चेत असते. प्रियंका सध्या आपला दीर जो जोनासच्या लग्नामध्ये व्यस्त आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola