Singer Alfaz Health Update: मुसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर प्राणघातक हल्ला, अंगावर घातली गाडी

झगमगाट
Pooja Vichare
Updated Oct 03, 2022 | 09:01 IST

Singer Alfaz Singh Deadly attack:अल्फाजवर झालेल्या हल्ल्याने प्रत्येकजण हैराण आणि अस्वस्थ आहे. अल्फाजला सध्या मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Alfaaz Health Update
पंजाबी गायक अल्फाजवर प्राणघातक हल्ला 
थोडं पण कामाचं
  • आता प्रसिद्ध पंजाबी गायक अल्फाज सिंगवर ( Alfaz Singh ) प्राणघातक हल्ला झाला आहे.
  • अल्फाजला सध्या मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
  • हे प्रकरण लांद्रा आणि बानूर रोडवर असलेल्या ढाब्यावरचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चंदीगड: Singer Alfaz Singh gets attacked: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालानंतर (Famous Punjabi Singer Sidhu moose wala) आता प्रसिद्ध पंजाबी गायक अल्फाज सिंगवर ( Alfaz Singh ) प्राणघातक हल्ला झाला आहे. अल्फाजवर झालेल्या हल्ल्याने प्रत्येकजण हैराण आणि अस्वस्थ आहे. अल्फाजला सध्या मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्फाज त्याच्या मित्रांसोबत एका ढाब्यावर जेवणासाठी गेला होता. तेव्हा काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर हे प्रकरण इतके वाढले की अल्फाजवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लांद्रा आणि बानूर रोडवर असलेल्या ढाब्यावरचे आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्ल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अधिक वाचा-  आरती सुरू असतानाच मंडपात शॉर्टसर्किट,आगीत 64 जण होरपळले

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगर हा आपल्या मित्रांसोबत ढाब्यावरून जात असताना एका छोट्या चारचाकी वाहनातून आलेल्या दोन ते तीन जणांनी सिंगरच्या अंगावर गाडी चढवली आणि सिंगर खाली पडला. त्यानंतर त्यांनी गाडी त्याच्या पायावर चढवली. यानंतर कार तिथेच सोडून शेताकडे पळाले. आरोपी पळत असताना सिंगरच्या मित्राने हल्लेखोर विकीला ओळखले जो पंचकुलाचा रहिवासी आहे. सिंगरला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


हनी सिंगने दिले अल्फाजचे हेल्थ अपडेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॅपर आणि गायक हनी सिंगने अल्फाजचा फोटो शेअर करून या दुःखद घटनेची माहिती दिली आहे. हनी सिंगने अल्फाजचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अल्फाज हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अल्फाजची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे फोटोवरून स्पष्टपणे दिसत आहे. 

फोटो शेअर करताना हनी सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काल रात्री माझा भाऊ अल्फाजवर कोणीतरी हल्ला केला. ज्याने ही प्लान आखला होता, मी त्याला सोडणार नाही, कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा.

कोण आहे अल्फाज 

अल्फाज हा खूप प्रसिद्ध गायक आहे. तो हनी सिंगसोबत अनेक अल्बममध्ये दिसला आहे. अल्फाजचे खरे नाव अनंजोत सिंग पन्नू आहे. त्यांचा जन्म चंदीगड येथे झाला. हनी सिंगच्या 'ही मेरा दिल' या अल्बममधून त्याने गायनात पदार्पण केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी