Pushpa: The Rule: पुष्पाच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटाचा धमाकेदार टिझर रिलीज झाला आहे. या भागात पुष्पाचा नवा लूक पाहून तुम्ही अल्लू अर्जुनच्या प्रेमात पडाल. (Pushpa 2 Teaser Released Allu Arjun staining style in Pushpa The Rule Teaser)
पुष्पा: द रुल टीझर (Pushpa: The Rule) पाहून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. पुष्पा: द रुलच्या टिझरमध्ये पुष्पा तुरुंगातून फरार झाल्याच आणि पुढे गायब झाल्याच दाखवलं आहे. तर बातम्यांमध्ये त्याला पोलिसांनी गोळ्या घातल्याचे दाखविलं आहे. दुसरीकडे पुष्पा बेपत्ता झाल्याची बातमी समजताच शहरात दंगल पेटते. लोकं पुष्पाच्या महानतेबद्दल भरभरुन बोलत आहेत आणि त्याला भेटण्याची वाट पाहत आहेत. अशात जवळपास महिन्याभराने पुष्पा अवतरतो आणि ठासून सांगतो की "आता पुष्पाच राज्य आहे..."
अधिक वाचा: WAR 2 : Hrithik Roshan पेक्षा जास्त पैसे घेणार Jr NTR
यापूर्वी 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचा पहिला भाग 2021 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट कोविडच्या निर्बंधांदरम्यान प्रदर्शित झाला असतानाही चित्रपटाने 350 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले होते. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत 100 कोटींची कमाई केली होती. त्याच वेळी जगभरात सुमारे 350 कोटी रुपयांची कमाई झाली. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त यामध्ये रश्मिका मंदाना देखील दिसली होती.
अधिक वाचा: Sushmita Sen ने हार्ट अटॅकनंतर पुन्हा सुरू केले वर्कआउट रूटीन, पहा Video