Raj Kundra : मला आणि माझ्या कुटुंबीयांना गोवण्यात आले, पहिल्यांदाच राज कुंद्राने सोडले मौन

पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्ल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. नंतर राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली होती. आता पहिल्यांदाच राज कुंद्राने मौन सोडले आहे. या सर्व प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले होते असा आरोप राज कुंद्राने केला आहे. Raj Kundra Opens up on his case I have already been pronounced guilty and my family have been subjected to a lot of pain

raj kundra
राज कुंद्रा 
थोडं पण कामाचं
  • पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती.
  • या सर्व प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले होते असा आरोप राज कुंद्राने केला आहे
  • आपण कुठल्याही प्रकारे अश्लील व्हिडीओ बनवलेच नाही असेही राज कुंद्राने म्हटले आहे.

Raj Kundra : Mumbai : पोर्नोग्राफी (pornography) प्रकरणी अभिनेत्री शिल्ल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अटक करण्यात आली होती. नंतर राज कुंद्राची जामिनावर (Bail) सुटका झाली होती. आता पहिल्यांदाच राज कुंद्राने मौन सोडले आहे. या सर्व प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले होते असा आरोप राज कुंद्राने केला आहे. तसेच आपण कुठल्याही प्रकारे अश्लील व्हिडीओ बनवलेच नाही असेही राज कुंद्राने म्हटले आहे. (Raj Kundra Opens up on his case I have already been pronounced guilty and my family have been subjected to a lot of pain)


एका वेबसाईटशी बोलताना राज कुंद्रा म्हणाला की सध्या हे प्रकरण न्यायाप्रविष्ट आहे, त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, म्हणून प्रत्येक चौकशीला पूर्ण सहकार्य करेन असेही राज कुंद्रा म्हणाला आहे. सत्याचाच विजय होईल असा विश्वास राज कुंद्राने व्यक्त केला. परंतु या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले आहे असा आरोप राज कुंद्राने केला आहे. माझ्या मानवी आणि संविधान अधिकारांचे उल्लंघन झाले असेही राज कुंद्रा म्हणाला

लपून बसलो नव्हतो

ट्रोलिंग आणि निगेटिव्हिटीमुळे आपल्याला खूप त्रास झाला असे राज कुंद्राने म्हटले आहे. मी कुठेही लपून बसलेलो नाही, मीडिया ट्रायलच्या माध्यमातून माझ्या खासगी आयुष्यान दखल देऊ नये असे राज कुंद्राने म्हटले आहे. माझ्यासाठी माझे कुटुंब नेहमीच महत्त्वाचे होते त्याशिवाय काहीच महत्त्वाचे नाही असेही राज कुंद्राने म्हटले आहे. एका व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असेही राज कुंद्राने नमूद केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

राज कुंद्राला चार आठवड्यांसाठी अटक होणार होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्राला दिलासा देऊन ही अटक टाळली आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर राज कुंद्राने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्या व्हिडीओवरून आपल्यावर कारवाई झाली आहे, त्यात कुठल्याही प्रकारे अडल्ट सीन नव्हते, अशा कुठल्याच प्रकारे शूट केले नव्हते असे राज कुंद्राने न्यायालयात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी