राजकारणाच्या मैदानात नाही दिसणार रजनीकांत

झगमगाट
Updated Dec 29, 2020 | 13:58 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

अभिनेता ते नेते बनलेले रजनीकांत यांनी आपल्या राजकीय खेळीबाबत यूटर्न घेतला आहे. त्यांनी घोषणा केली की ते राजकीय भागाचा हिस्सा होणार नाहीत. 

rajnikanth
राजकारणाच्या मैदानात नाही दिसणार रजनीकांत 

थोडं पण कामाचं

  • दक्षिण भारताचे सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी घोषणा, राजकारणात भाग घेणार नाहीत
  • कोरोनामुळे होत असलेल्या समस्यांबाबतही व्यक्त केली काळजी
  • रजनीकांत यांनी आजाराचे कारण दिले तसेच चाहत्यांची माफी मागितली

चेन्नई: अभिनेता(actor) ते नेता(leader) असा प्रवास केलेले रजनीकांत(rajnikant),जे येत्या ३१ डिसेंबरला आपल्या राजकीय पक्षाची(political party) घोषणा करण्यास तयार होते. मात्र त्याआधीच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला आहे. त्यांनी खुद्द हा निर्णय घेतला आहे. तामिळ सुपरस्टार यांनी आता घोषणा केली की ते राजकारणात सामील होणार नाहीत. ते म्हणाले निवडणूक राजकारणात उतरल्याशिवाय जनतेची सेवा करण्यासाठी मी काय करणार. ते म्हणाले, जे माझ्या चांगल्याचा विचार करतात जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्यासाठी जगतात आणि तामिळनाडूच्या लोकांना खुश करण्यासाठी माझ्या या निर्णयाचे स्वागत करा. 

माझी तब्येत हा देवाचा इशारा

रजनीकांत यांनी आपल्या विधानात कोरोना व्हायरस या महामारीबद्दल काळजी व्यक्त केली. ते सांगतात त्यांची सध्याची तब्येत पाहता देवाने त्यांच्यासाठी कोणतातरी भयानक संदेश पाठवला आहे. ते म्हणतात कोरोनामुळे त्यांना ज्या समस्यांचा सामना करावा लागला ते सांगणे कठीण आहे. आपल्या राजकीय खेळीबद्दल ते म्हणाले, जर मी पार्टी सुरू केल्यानंतर केवळ मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केल्यास तर मी राजकीय उलथा-पालथ करू शकणार नाही आणि यात मोठा विजय मिळवू शकेन. 

रजनीकांत यांनी सांगितले, अन्नाथे सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेलो होतो. आम्ही साधारण १२० लोकांचे फिल्म क्रूसाठी एक दैनिक कोविड चाचणी केली. सर्वांनी फेसमास्क घातले होते तसेच शूटिंगही सावधानतेने सुरू होते. इतकी काळजी घेतली जात असतानाही समजले की ४ लोकांना कोरोना झाला होता. दिग्दर्शकानने लगेचच सिनेमाचे शूटिंग बंद केले. तसेच सर्वांची चाचणी केली. दरम्यान, माझी कोविडची चाचणी निगेटिव्ह झाली. मला रक्तदाब बोता. जर हेच कायम राहिले असते  तर माझी ट्रान्सप्लाट केलेली किडनी खराब झाली होती. यासाठी मला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. 

निवडणुकीय राजकारणाशिवाय जनतेची सेवा

निवडणुकीय राजकारणात उतरल्याशिवाय मी जनतेची सेवा करण्यास काय करेलन. मी खरे बोलण्यास कधीच हडबडलो नाही आणि इमानदारीने तसेच पारदर्शकतेने प्रेम करणाऱ्या तामिळनाडूच्या चाहते आणि लोकांना निवेदन करतो ज्यांना माझं भलं बुर माहीत आहे, जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्यासाठी जगतात. तसेच तामिळनाडूच्या लोकांना खुश करण्यासाी माझ्या या निर्णयाचा स्वीकार करा. 

राजकारणात येण्याचे दिले होते संकेत

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. यावर कमल हसन म्हणाले होते की रजनीकांत राजकारणाचा भाग झाल्या.  त्यांना खूप आनंद होईल 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी