Raju Srivastava: राजू श्रीवास्तव Ventilator वर, प्रकृतीसंदर्भात कुटुंबीयांनी दिली मोठी अपडेट

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 13, 2022 | 07:57 IST

Raju Srivastava Health: दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दलच्या अफवा सुरू झाल्या आहेत. मुंबईतील काही वेबपोर्टलवर त्यांच्यासाठी शोकसंवेदनाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.

raju-srivastava
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भातले अपडेट्स 
थोडं पण कामाचं
  • राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना हृदयविकाराच्या झटका (heart attack) आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
  • सध्या ते दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील आयसीयू दाखल (Delhi's AIIMS hospital)आहेत.
  • मुंबईतील काही वेबपोर्टलवर त्यांच्यासाठी शोकसंवेदनाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.

नवी दिल्ली:  Raju Srivastava Health Update: स्टँड-अप कॉमेडियन (Stand-up comedian) आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना हृदयविकाराच्या झटका (heart attack) आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील आयसीयू दाखल (Delhi's AIIMS hospital)आहेत. हळूहळू त्यांच्या तब्येतीत काहीशी सुधारणा होत आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दलच्या अफवा सुरू झाल्या आहेत. मुंबईतील काही वेबपोर्टलवर त्यांच्यासाठी शोकसंवेदनाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेकांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजू यांच्या निधनाबाबत पसरलेल्या या अफवांदरम्यान कुटुंबीयांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विट केलं आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते लवकर बरे व्हावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

अधिक वाचा-  मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी बरसणार, या १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट

ताज्या अपडेटनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. अभिनेता शेखर सुमननं ट्विट करून त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

शेखर सुमन यांनी ट्विट करून राजू श्रीवास्तव यांची प्रकृती कशी आहे हे सांगितले

अभिनेत्याने ट्विट करून सांगितलं की, राजूने आपले बोट आणि खांदा किंचित हलवला आहे. याला सकारात्मक प्रतिसाद असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तुमच्या प्रार्थना काम करत आहेत. प्रार्थना करत राहा.

निधनाच्या अफवा 

या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे आणि आम्ही त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. तुमच्या सततच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्याबद्दल  सर्व शुभचिंतकांचे आभार. मी सर्वांना आवाहन करतो की अफवा, खोट्या बातम्यांवर तुम्ही लक्ष देऊ नका.  राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा."

व्हेंटिलेटरवर आहेत राजू श्रीवास्तव

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या मेंदूला इजा झाली आहे. राजू श्रीवास्तव हे गेल्या 46 तासांपासून शुद्धीवर आले नाहीत. राजू श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांचे पथक व्यस्त आहे. प्रत्येकजण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या पत्नीला आर्थिक मदतीची ऑफर दिली होती.

राजू श्रीवास्तव घेतात त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिनं सांगितलं होतं की, तिचे वडील त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेतात. ते रोज जिमला जायचे, कधी ही ते त्यांचा वर्कआउट मिस करायचे नाही. मुलीने पुढे सांगितले की, त्यांना कोणत्याही आजार नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात 100 टक्के ब्लॉक आढळले.

राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्यांनी गजोधर सारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारल्या, ज्यामुळे त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली. कॉमेडियन द कपिल शर्मा, कॉमेडी सर्कस यासह अनेक शोमध्ये दिसले. याशिवाय कॉमेडियन तेजाब, बाजीगर, मैने प्यार क्यूं किया यांसारख्या सिनेमांमध्ये ही काम केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी