Raju Srivastava: राजू श्रीवास्तव अजूनही Ventilator वर, कॉमेडियनच्या प्रकृतीसंदर्भात समोर आली मोठी अपडेट

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 17, 2022 | 12:20 IST

Raju Srivastava Health: गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेता सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहे, जिथे डॉक्टर त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Raju Srivastava Health
राजू श्रीवास्तव हेल्थ अपडेट्स 
थोडं पण कामाचं
  • कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) यांना गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटका (heart attack) आला.
  • गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेता सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहे.
  • जिथे डॉक्टर त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

 नवी दिल्ली: Raju Srivastava Health Update Today:  कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) यांना गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटका (heart attack) आला. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर (ventilator) आहेत. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेता सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहे, जिथे डॉक्टर त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या दरम्यान राजूचे व्यवस्थापक नयन सोनी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची (Raju Srivastava's health.)  एक अपडेट शेअर केली आहे.  

त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि शरीराची हालचाल देखील सतत वाढत आहे. मात्र त्यांना शुद्धीवर येण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. एक आठवडा लागेल असं त्यांनी सांगितलं. 

अधिक वाचा- मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरूणीसोबत घडला घृणास्पद प्रकार, ऐकून अंगावर येईल काटा

एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर नितीश नायक यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. असं म्हटलं जात आहे की, पुढील आठवड्यापर्यंत ते पुन्हा शुद्धीत येईल. मात्र पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागेल.

दरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे व्यवस्थापक नयन सोनी यांनी सांगितले. पीटीआयच्या रिपोर्टमध्ये नयननं यांनी सांगितले की, राजू यांची प्रकृती हळूहळू बरी होत आहे आणि ते उपचारांना प्रतिसाद देत आहे. राजू आता त्यांच्या शरीराचे अवयव थोडे हलवत आहे. ते अजूनही आयसीयूमध्ये आणि व्हेंटिलेटरवर आहे. त्यांना शुद्धीवर यायला जवळपास वेळ लागेल. 

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा

दक्षिण दिल्लीतील एम्समध्ये दाखल असलेल्या कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. असं असलं तरी ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत आणि 10 ऑगस्टपासून दाखल असलेल्या राजू श्रीवास्तव यांना 8 व्या दिवशीही शुद्ध आलेली नाही.

जिममध्ये पडले बेशुद्ध 

10 ऑगस्ट रोजी व्यायाम करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराची पुष्टी केली आणि त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी