Srivastava Brothers: श्रीवास्तव बंधू AIIMS मध्ये, दोन्ही भावांवर एकाच रूग्णालयात उपचार; कुटंबीय चिंतेत

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 13, 2022 | 11:43 IST

Raju Srivastava health Update: भिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं दिल्लीतल्या एम्स (AIIMS) रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Srivastava brother
श्रीवास्तव बंधू एम्समध्ये रूग्णालयात 
थोडं पण कामाचं
  • 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव बेशुद्ध पडले.
  • उपचारानंतर राजू यांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला आणि त्यांची अँजिओप्लास्टी ही झाली.
  • राजू श्रीवास्तव यांचा धाकटा भाऊ काजू हे देखील एम्समध्ये दाखल असल्याची माहिती मिळतेय.

नवी दिल्ली: Raju Srivastava younger brother also admitted: कॉमेडियन (Comedian) आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava)  यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं दिल्लीतल्या एम्स (AIIMS) रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार, उपचारानंतर राजू यांना हृदयविकाराचा (Heart Attack)  झटका आला आणि त्यांची अँजिओप्लास्टी ही झाली. कालपासून राजू यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचा धाकटा भाऊ काजू हे देखील एम्समध्ये दाखल असल्याची माहिती मिळतेय. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कानाजवळ आलेल्या गाठीचे ऑपरेशन करण्यात आले आहे. ते गेल्या ३ दिवसांपासून एम्समध्ये दाखल आहेत. राजू यांच्यावर एम्समधील कार्डियाक युनिटमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. यासोबतच राजू श्रीवास्तव सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या अफवा 

राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दलच्या अफवा सुरू झाल्या आहेत. मुंबईतील काही वेबपोर्टलवर त्यांच्यासाठी शोकसंवेदनाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेकांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजू यांच्या निधनाबाबत पसरलेल्या या अफवांदरम्यान कुटुंबीयांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विट केलं आहे.

अधिक वाचा-  रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भावानं केला मोठा प्रताप, थेट पोहोचला तुरूंगात

निधनाच्या अफवा 

या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर आहे आणि आम्ही त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. तुमच्या सततच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्याबद्दल  सर्व शुभचिंतकांचे आभार. मी सर्वांना आवाहन करतो की अफवा, खोट्या बातम्यांवर तुम्ही लक्ष देऊ नका.  राजू श्रीवास्तव यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा."

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते लवकर बरे व्हावे यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.  

 

राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्यांनी गजोधर सारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारल्या, ज्यामुळे त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली. कॉमेडियन द कपिल शर्मा, कॉमेडी सर्कस यासह अनेक शोमध्ये दिसले. याशिवाय कॉमेडियन तेजाब, बाजीगर, मैने प्यार क्यूं किया यांसारख्या सिनेमांमध्ये ही काम केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी