राणा दग्गुबाती संतापला, तिरुपतीमध्ये फॅनचा Mobile हिसकावून घेतला

Rana Daggubati SNATCHES fan's phone after he tries to take a selfie in Tirupati temple : अभिनेता राणा दग्गुबाती संतापला. एका चाहत्याच्या वर्तनामुळे तो संतापला.

Rana Daggubati SNATCHES fan's phone after he tries to take a selfie in Tirupati temple
राणा दग्गुबाती संतापला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राणा दग्गुबाती संतापला
  • तिरुपतीच्या बालाजी मंदिरात फॅनचा Mobile हिसकावून घेतला
  • याआधी पत्रकारांना एका बाजुने चालत फोटो काढण्याचे आवाहन राणा दग्गुबातीने केले होके

Rana Daggubati SNATCHES fan's phone after he tries to take a selfie in Tirupati temple : अभिनेता राणा दग्गुबाती संतापला. एका चाहत्याच्या वर्तनामुळे तो संतापला. बाहुबली सिनेमातील भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या राणा दग्गुबाती याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. चाहते त्याला एकदा बघता यावे म्हणून धडपडत असतात. तिरुपती येथे बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या राणा दग्गुबाती याला बघण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरू होती. ही धडपड सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली.

सेलिब्रेटींचा कार्गो प्रिंटमधील हॉट लूक

सेलिब्रेटींना आवडणारे दागिने

राणा दग्गुबाती तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी आला होता. दग्गुबातीसोबत त्याची पत्नी मिहिका बजाज आणि वडील डी सुरेश बाबू आले होते. तिघे मंदिरात आले त्यावेळी राणा दग्गुबातीचे फोटो काढण्यासाठी अनेक फोटोग्राफरची गर्दी झाली होती. अखेर राणा दग्गुबातीने सर्व फोटोग्राफरचा एका बाजुने चालत फोटो काढा अशी विनंती केली आणि घरच्यांसोबत मंदिराच्या दिशेने पुढे जाण्यास सुरुवात केली. फोटोग्राफरनी राणा दग्गुबातीच्या विनंतीचा मान राखून एका बाजुने चालत फोटो काढण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी एक चाहता समोरून मोबाईल हाती घेऊन पुढे आला. त्याने राणा दग्गुबातीला अडविले आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संतापलेल्या राणा दग्गुबातीने रागाच्या भरात चाहत्याचा मोबाईल हिसकावून हातात घेऊन त्याला फोटो काढण्यास मनाई केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी