Ranbir Alia wedding : अखेर रणबीर-आलियाच्या लग्नाचं कंफर्मेशन मिळालं..., अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्रमधला रोमँटिक व्हिडिओ केला शेअर

अयान मुखर्जीने अखेर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नगाठ बांधत असल्याचे कंफर्म केले. ब्रह्मास्त्रच्या दिग्दर्शकाने चित्रपटातील कपलचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आणि त्यांचे अभिनंदन केले.

Ranbir-Alia's wedding finally confirmed ..., Ayan Mukherjee shared a romantic video from Brahmastra
Ranbir Alia wedding : अखेर रणबीर-आलियाच्या लग्नाचं कंफर्मेशन मिळालं..., अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्रमधला रोमँटिक व्हिडिओ केला शेअर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा
  • लग्नाची पुष्टी अयान मुखर्जीने केली आहे.
  • ब्रह्मास्त्रमधला एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला

मुंबई : रणबीर आणि आलियाचे लग्नसोहळ्याची सोशल मिडियावर तुफान चर्चा सुरू आहे. हे जोडपे रणबीरच्या पाली हिल हाऊसमध्ये लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. तारखा अजूनही हवेत असताना, बहुतेक रिपोर्ट सांगतात की लग्न 14 एप्रिल रोजी होत आहे. दरम्यान, अयान मुखर्जीने अखेर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न करणार असल्याचे कंफर्म केले आहे. दिग्दर्शकाने या जोडप्याच्या आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रमधील एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. (Ranbir-Alia's wedding finally confirmed ..., Ayan Mukherjee shared a romantic video from Brahmastra)

अधिक वाचा : Urfi Javed Latest Video: उर्फीची बॅकलेस ड्रेसमध्ये अनोखी चाल, अचानक वळून जिंकली चाहत्यांची मने 

केशरिया असे या गाण्याचे शीर्षक आहे, अरिजित सिंगने गायले आहे आणि वाराणसीच्या रस्त्यांवर रणबीर आणि आलियाच्या रोमान्सची झलक यात दिसते. हे जोडपे फुलांच्या पाकळ्यांत धावताना दिसतात. 

अधिक वाचा : आता लग्नाच्या सीझनमध्ये या गाण्यावर 'नाचो नाचो', RRR च्या एका स्टेपसाठी अभिनेत्यांला लागले 18 दिवस

व्हिडिओ शेअर करताना अयानने लिहिले की, 'रणबीर-आलियासाठी! आणि… या पवित्र प्रवासासाठी ते लवकरच सुरू होणार आहेत! रणबीर आणि आलिया… या जगातली माझी सर्वात जवळची आणि प्रिय माणसं… ज्यांनी माझ्या आयुष्यात सर्वकाही जोडलं आहे… आणि पूर्णपणे आणि निस्वार्थपणे आमच्या चित्रपटात…! आम्हाला फक्त त्यांच्या भेटीचा एक भाग शेअर करायचा होता, आमच्या चित्रपटातून, आमच्या केशरिया गाण्यातील, त्यांना साजरे करण्यासाठी… त्यांना आणि सर्वांना भेट म्हणून!!”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

दिग्दर्शकाने लग्न होत असल्याचे कंफर्म केले असले तरी लग्नाच्या तारखेबाबत त्यांनी मौन बाळगले. ब्रह्मास्त्रच्या सेटवर रणबीर आणि आलिया प्रेमात पडले. हा चित्रपट दोघेही पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करत आहे. या पोस्टला आलिया भट्टने कमेन्ट सेक्शनमध्ये जाऊन हार्ट इमोजीस टाकले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी