रणबीरच्या 'तू झूठी मैं मक्कर'ने 11 दिवसांत केली 100 कोटींची कमाई, कपिलचा झ्विगातो प्रेक्षकांच्या शोधात

Tu Jhoothi Main Makkaar Box Office collection : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने 11 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. असे करणारा रणबीरचा हा सहावा चित्रपट ठरला आहे.

Ranbir's 'Tu Jhoothi Main Makkar' earns 100 crores in 11 days
रणबीरच्या 'तू झूठी मैं मक्कर'ने 11 दिवसांत केली 100 कोटींची कमाई, कपिलचा झ्विगातो प्रेक्षकांच्या शोधात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • १०० क्लबमध्ये रणबीर कपूरचा सहावा चित्रपट
  • 'तू झुठी मैं मक्कर'  चित्रपटाने 11 दिवसांत 100 कोटींची कमाई
  • राणी मुखर्जीचे मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटातून पुनरागमन

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटाला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दुसरीकडे, कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने 2 दिवसात एक कोटींचा आकडा पार केला आहे. (Ranbir's 'Tu Jhoothi Main Makkar' earns 100 crores in 11 days)

अधिक वाचा : Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना दुर्घटना, तरुण 100 फूट खाली कोसळला

 'तू झुठी मैं मक्कर'  चित्रपटाने 11 दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. यासह हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करणारा रणबीर कपूरच्या करिअरमधील सहावा चित्रपट ठरला आहे. याआधी 2022 मध्ये रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्याने 200 कोटींहून अधिक कमाई केली होती. याशिवाय रणबीरच्या बर्फी, संजू, ये जवानी है दिवानी आणि ये दिल है मुश्किल या चित्रपटांनीही 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

तसेच कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 1 कोटींचा आकडाही पार केला आहे. हे करण्यासाठी चित्रपटाला 2 दिवस लागले. कपिल शर्माचा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मात्र या चित्रपटाला अपेक्षित प्रेक्षक मिळत नाहीत.

अधिक वाचा : Alia Bhatt Net Worth: लक्झरी कार, करोडोंचे घर, पहा आलिया भट्टच्या श्रीमंतीचा थाट

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने नुकतेच मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटातून पुनरागमन केले आहे. या चित्रपटालाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या 2 दिवसांत या चित्रपटाने 3 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.27 कोटींची कमाई केली होती तर रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 2.50 कोटींची कमाई केली आहे. या अर्थाने, चित्रपटाचे दोन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 3.77 कोटी झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी