मुंबई : बॉलिवूडचा स्टार अभिनेता रणवीर सिंगने आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हटके स्टाईलमुळे फार कमी वेळात मोठे नाव कमावले आहे. पण आता तो वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. रणवीर सिंग भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी बनला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत पुढे असायचा. पण आता रणवीर सिंगने त्याला मागे टाकले आहे. तो कोहलीपेक्षाही पुढे गेला आहे. (Ranveer Singh becomes India's richest celebrity, surpassing Virat Kohli in brand value)
अधिक वाचा : Suhana Khan Photos शाहरुख खानच्या लेकीने शेयर केले असे फोटोज, बेस्ट फ्रेंड अनन्या, शनाया झाल्या रिएक्ट
कॉर्पोरेट इंवेस्टीगेशन आणि रिस्क कंसल्टिंग फर्म क्रोलच्या 2022 च्या रिपोर्टनुसार, रणवीर सध्या $181.7 दशलक्ष ब्रँड मूल्यासह भारतातील सर्वात श्रीमंत स्टार आहे. आणि 2022 मध्ये विराट कोहलीचे ब्रँड मूल्यांकन 176.9 असे नमूद केले आहे. विराट गेल्या पाच वर्षांपासून भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी आहे, परंतु त्यानंतर तो दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
अधिक वाचा : Aamir Khan Fitness Secret अमीर खान 58 व्या वर्षी देखील दिसतो इतका तरुण ! या दोन गोष्टीत लपले आहे गुपीत
क्रोलच्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये रणवीरचे ब्रँड व्हॅल्यूएशन $158.3 मिलियन होते, जे या एका वर्षात 29.1 टक्क्यांनी वाढले आहे. आता जर रणवीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो मागील दोन महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'सर्कस' चित्रपटात दिसला होता. मात्र, त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. यानंतर आता तो शानदार कमबॅक करत आहे. रणवीर आता 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.