Saif Ali Khan Girlfriend: अमृता सिंगच्या घटस्फोटानंतर आणि करिना कपूरशी लग्न करण्याआधी ही होती सैफ अली खानची गर्लफ्रेंड

Saif Ali Khan Affair | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे खूप चर्चेत राहिला आहे. सैफ अली खानचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत १९९१ मध्ये झाले होते. लग्नाच्या वेळी अमृता सिंग इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तर त्यावेळी सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केले नव्हते.

Rosa Catalano was Saif Ali Khan's girlfriend after divorcing Amrita Singh and before marry Kareena Kapoor
अमृता सिंगच्या घटस्फोटानंतर ही होती सैफची गर्लफ्रेंड  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सैफ अली खानचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत १९९१ मध्ये झाले होते.
  • अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफच्या जीवनात मॉडेल रोजा कॅटलोनाची एंट्री झाली होती.
  • रोजा कॅटलोनसोबतच्या ब्रेकअपनंतरच सैफच्या आयुष्यात करिना कपूरची एन्ट्री झाली.

Saif Ali Khan Affair | नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आपल्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे (Personal Life) खूप चर्चेत राहिला आहे. सैफ अली खानचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत (Amrita singh) १९९१ मध्ये झाले होते. (Rosa Catalano was Saif Ali Khan's girlfriend after divorcing Amrita Singh and before marry Kareena Kapoor).   

लग्नाच्या वेळी अमृता सिंग इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तर त्यावेळी सैफने बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पणही केले नव्हते. लक्षणीय बाब म्हणजे लग्नाच्या वेळी सैफ अली खान फक्त २१ वर्षांचा होता, तर अमृता सिंग ३३ वर्षांची होती. या लग्नानंतर त्यांना सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) ही दोन मुले झाली. मात्र लग्नाच्या एक वर्षानंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या, त्यानंतर २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Also Read : लग्नांनंतर शारीरिक संबंधांची अपेक्षा ठेवणं योग्य-Court

माध्यमांच्या माहितीनुसार, अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफच्या जीवनात मॉडेल रोजा कॅटलोनाची (Rosa Catalano) एंट्री झाली होती. दरम्यान त्या काळात रोजा आणि सैफ लिव इन रिलेशनशिपमध्ये होते असे बोलले जाते. माहितीनुसार, त्यांची केनियामध्ये भेट झाली होती, त्यानंतर सैफनंतर रोजा भारतात आली. मात्र, २००७ पर्यंत सैफ आणि रोजाच्या ब्रेकअपच्या बातम्याही चांगल्याच झळकल्या होत्या. 

रोजा कॅटलोनसोबतच्या ब्रेकअपनंतरच सैफच्या आयुष्यात करिना कपूरची (Kareena Kapoor) एन्ट्री झाली. २००८ मध्ये 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती आणि अखेर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. आज करिना आणि सैफ बॉलिवूड इंडस्ट्रीतील बहुचर्चित जोडप्यांपैकी एक आहे. तसेच ती दोघे दोन मुले तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जहांगीर अली खान (Jehangir Ali Khan) यांचे पालक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी