RRR In Golden Globe Award 2023: एसएस राजामौली (SS Rajamouli)यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटाने( film) फक्त देशातच नाही तर अख्या जगात आपला डंका वाजवला आहे. या चित्रपटासोबत अजून कामगिरी जोडल्या जाणार आहे. आलिया भट्ट, रामचरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर यांचा चित्रपट आरआरआर आता आंतरराष्ट्रीय गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2022 मध्ये या चित्रपटाला दोन नामांकने मिळाली आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-इंग्रजी भाषेतील चित्रपट आणि चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळालं आहे. ('RRR' hits worldwide, gets two nominations for Golden Globe Awards 2023)
अधिक वाचा : PM मोदी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलतात - शरद पवार
'RRR'हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार श्रेणीत स्थान मिळवणारा हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. याआधी, RRR हा चित्रपट ऑस्करसाठीही पाठवण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्या पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट अधिकृत प्रवेशापासून मागे राहिला होता.
अधिक वाचा : चीनच्या 300 सैनिकांसोबत भारतीय सैनिकांची झटापट, अनेक जखमी
आरआरआर या चिटपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. िग्दर्शक एसएस राजामौली यांना न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर प्रेक्षक हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याची मागणी करत आहेत. या चित्रपटाला मिळालेलं यश पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. हा चित्रपट पुन्हा प्रद्शित करण्यात यावा अशी मागणी केली जात आहेत.
जेव्हा हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी त्यांच्या चित्रपटाची जागतिक स्तरावर जाहिरात करण्यासाठी थिएटरला भेट दिली, जिथे ते त्यांच्या चाहत्यांनाही भेटले. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट याच्या मुख्य भूमिका आहेत. श्रिया सरन, अजय देवगण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आरआरआरने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.