Priyanka Jawalkar : व्यंकटेश अय्यर आणि तेलुगू अभिनेत्री प्रियंका जवळकरमध्ये गुटरगु? इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे चर्चांना उधाण

कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंटर व्यंकटेश अय्यरने २०२१ आयपीएलमध्ये उत्तम खेळी खेळली होती. अय्यरने उत्तम कामगिरी केल्यामुळे युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये केकेआरला फायनलमध्ये पोहोचले होते. त्यानंतर अय्यर भारतीय टीमसाठीही खेळला होता. आता व्यंकटेश अय्यर तेलुगू अभिनेत्री प्रियंका जवळकरला डेट करत आहे अशी अफवा पसरली आहे.

priyanka jawalkar
प्रियंका जवळकर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंटर व्यंकटेश अय्यरने २०२१ आयपीएलमध्ये उत्तम खेळी खेळली होती.
  • अय्यरने उत्तम कामगिरी केल्यामुळे युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये केकेआरला फायनलमध्ये पोहोचले होते.
  • आता व्यंकटेश अय्यर तेलुगू अभिनेत्री प्रियंका जवळकरला डेट करत आहे अशी अफवा पसरली आहे.

Priyanka Jawalkar : मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंटर व्यंकटेश अय्यरने २०२१ आयपीएलमध्ये उत्तम खेळी खेळली होती. अय्यरने उत्तम कामगिरी केल्यामुळे युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये केकेआरला फायनलमध्ये पोहोचले होते. त्यानंतर अय्यर भारतीय टीमसाठीही खेळला होता. आता व्यंकटेश अय्यर तेलुगू अभिनेत्री प्रियंका जवळकरला डेट करत आहे अशी अफवा पसरली आहे. त्यात अय्यरने प्रियंकाच्या एका फोटोवर कमेंट केल्याने या चर्चांना उधाण आले आहे. 

कोण आहे प्रियंका जवळकर?

कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू व्यंकटेश अय्यरसाठी मागील वर्षे हे एका स्वप्नासारखे राहिले आहे. आयपीएल २०२१ पूर्वी अय्यरला फार कोणी ओळखत नव्हते. परंतु अय्यरने आपली टीम केकेआरला फायनलपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अय्यरला भारतासाठी खेळण्यासाठी संधी मिळाली होती. आता अय्यर प्रियंका जवळकर या अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे. 


व्यंकटेशने प्रियंकांच्या फोटोवर केली कमेंट

व्यंकटेश अय्यरने नुकतंच तेलुगु अभिनेत्री प्रियंका जवळकरच्या इन्स्टाग्रामवरील एका फोटोवर कमेंट केली होती. व्यंकटेशने प्रियंकाच्या फोटोखाली क्युट म्हटले होते.  तेव्हापासून दोघे रीलेशनशिपमध्ये आहेत का अशी चर्चा होत आहे. 

प्रियंकाचा भन्नाट रिप्लाय

व्यंकटेशने प्रियंकाला क्युट म्हटले होते. त्यावर प्रियंकाने कोण? तुम्ही का? असा रिप्लाय दिला होता.

२०१७ मध्ये पदार्पण

प्रियंका जवळकरने २०१७ मध्ये तेलुगु चित्रपटातून पदार्पण केले होते. प्रियंकाचा पहिला चित्रपट कला वरम हा होता. त्यानंतर प्रियंकाने टॅक्सीवाला, थिमारुस आणि एसआर कल्याणमंडपम चित्रपटात काम केले होते. 


व्यंकटेशला ८ कोटींची बोली

२०२१ साली झालेल्या लिलावात केकेआरने व्यंकटेश अय्यरला २० लाख रुपयांत विकत घेतले होते. नंतर या वर्षी अय्यरला ८ कोटी रुपयांची बोली लागली होती. अय्यर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशसाठी खेळला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी