Bollywood: ‘सैराट’च्या गायिकेकडे सोशल मीडियावर नग्न फोटोची मागणी

झगमगाट
Updated May 22, 2019 | 15:34 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Bollywood: सैराट सिनेमाचं टायटल साँग गायलेल्या चिन्मयी श्रीपादला नुकताच सोशल मीडियावर अतिशय वाईट अनुभव आला आहे. पण, तिनं यावर गप्प न बसता अतिशय धाडसानं त्याला प्रत्युत्तर दिलंय. चाहत्यांकडून त्याचं कौतुक होतय.

fan asked for nude photo to chinmayi shreepad
गायिका चिन्मयी श्रीपादकडे नग्न फोटोची मागणी   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : सेलिब्रेटींसाठी सध्या सोशल मीडिया डोकेदुखी ठरत आहे. या माध्यमातून सेलिब्रेटी त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात तर राहू शकतात. पण, अनेकदा त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं तसचं काहीवेळी वाईट कमेंट्सना सामोरं जावं लागतं. अर्थात हे काही नवं राहिलेलं नाही. पण, सैराट सिनेमाचं टायटल साँग गायलेल्या चिन्मयी श्रीपादला नुकताच सोशल मीडियावर एक अतिशय वाईट अनुभव आला आहे. पण, तिनं यावर गप्प न बसता अतिशय धाडसानं त्याला प्रत्युत्तर दिलंय. या अनुभवाविषयी चिन्मयीनं स्वतः ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या पाठिशी अनेकजण उभे राहिले आहेत.

त्याने अकाऊंटच केले डिलिट

चिन्मयीनं ट्विटरवर आपल्या मोबाईलचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीनं तिला मेसेज करून तिच्याकडे नग्न फोटोंची मागणी केली आहे. त्यावर चिन्मयीनं त्याला सडेतोड उत्तर दिलंय. चिन्मयीला एकानं 'सेंड न्यूड्स' असा मेसेज पाठवला आहे. त्यावर चिन्मयीनं त्याला लिप्सस्टिचे न्यूड शेड्स पाठवले आहेत. बऱ्यापैकी स्कीन टोनशी मॅच करणारे हलक्या रंगाचे हे न्यूज शेड्स असतात. चिन्मयीच्या या ट्वीटवर तिच्या फॅन्सनी त्या व्यक्तीला जोरदार ट्रोल केलंय. तिच्या फॅन्सनी म्हटलंय की, अशा प्रत्युत्तराची त्याला अपेक्षा नसावी. तर, काहींनी असं म्हटलंय की अशा बदमाश लोकांना असेच उत्तर द्यायला हवे. विशेष म्हणजे, चिन्मयीच्या पोस्टला घाबरून त्या व्यक्तीने त्याचे अकाउंटच डिलिट करून टाकले आहे.

 

कोण आहे चिन्मयी श्रीपाद?

चिन्मयी श्रीपाद ही दाक्षिणात्य सिनेमांमधील एक लोकप्रिय गायिका आहे. मूळच्या चेन्नईच्या या गायिकेने हिंदी सिनेमांमध्येही चांगली गाणी गायली आहेत. सन टीव्हीवरच्या सप्तस्वरांगल या रिअॅलिटी शोमध्ये ती विजेती ठरली होती. त्यानंतर ए. आर. रेहमान यांनी तिला ब्रेक दिला. बॉलीवूडमध्ये मंगल पांडे-दी रायझिंग या सिनेमात होली रे हे गाणं तिनं गायलं होतं. त्यानंतर मणिरत्नम यांच्या 'गुरू'मध्ये माया माया आणि तेरे बिना ही दोन गाणी तिनं गायली होती. ही गाणी खूप गाजली होती. आताही रेडिओवर या गाण्यांसाठी चाहते फर्माईश देतात. मराठीमध्ये 'सैराट' सिनेमात चिन्मयीनं टायटल साँग गायलं होतं. तेदेखील खूप लोकप्रिय ठरलं होतं. 'चेन्नई एक्स्प्रेस'मधील तितली गाणं आणि 'हंसी तो फंसी'मधलं जहनसीब हे गाजलेलं गाणं ही चिन्मयीनं गायलं आहे. दक्षिणेत तामिळ, तेलुगुसह मल्याळम, कन्नड तसेच तुल्लू सिनेमांची गाणीही तिनं गायली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bollywood: ‘सैराट’च्या गायिकेकडे सोशल मीडियावर नग्न फोटोची मागणी Description: Bollywood: सैराट सिनेमाचं टायटल साँग गायलेल्या चिन्मयी श्रीपादला नुकताच सोशल मीडियावर अतिशय वाईट अनुभव आला आहे. पण, तिनं यावर गप्प न बसता अतिशय धाडसानं त्याला प्रत्युत्तर दिलंय. चाहत्यांकडून त्याचं कौतुक होतय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles