गँगस्टर्सकडून बॅक टू बॅक धमक्या मिळत असल्याने सलमान खाननं उचललं मोठं पाऊल

झगमगाट
Updated Apr 07, 2023 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salman Khans news Bullet Proof SUV: बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सुपरस्टार सलमान खान याला गँगस्टर्सकडून बॅक टू बॅक धमक्या मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानला जिवे मारण्याची धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षिततेत वाढ देखील केली आहे. मात्र, वारंवार धमक्या मिळत असल्याने सलमानने मोठं पाऊल उचललं आहे. सलमानने नवी बुलेटप्रूफ गाडी खरेदी केली आहे.

Salman khan
गँगस्टर्सकडून बॅक टू बॅक धमक्या मिळत असल्याने सलमान खानने उचललं मोठं पाऊल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सुपरस्टार सलमान खान याला गँगस्टर्सकडून बॅक टू बॅक धमक्या मिळत आहेत.
  • वारंवार धमक्या मिळत असल्याने सलमानने मोठं पाऊल उचललं आहे.
  • मागील अनेक वर्षांपासून सलमान खान हा गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी बरारच्या निशाण्यावर आहे.

Salman Khans news Bullet Proof SUV: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गँगस्टरकडून बॅक टू बॅक धमक्या मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तर त्याला जिवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल देखील आला होता. या पार्श्वभूमीवर सलमान खान याने स्वतः च्या सेफ्टीसाठी नवी बुलेटप्रूफ गाडी खरेदी केली आहे. निसान पेट्रोल एसयूव्हीचा (Nissan Patrol SUV) आता सलमानच्या कार कलेक्शनमध्ये समावेश झाला आहे. सलमानने ही गाडी साऊथ आशिया मार्केटमधून खरेदी केली आहे. ही सर्वाधिक लोकप्रिय आणि महागडी एसयूव्ही आहे. ही बुलेटप्रूफ गाडी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत खास आहे. मात्र, ही गाडी भारतीय बाजारात लॉन्च झालेली नाही. 

सलमानने स्वत: च्या सुरक्षितेच्या दृष्टीने बुलेटप्रुफ गाडी खरेदी केली आहे. निसान पेट्रोल एसयूव्हीमध्ये अनेक अद्ययावत सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे सलमानने  Nissan Patrol SUV ही गाडी साउथ आशियातून इम्पोर्ट केली आहे. 

सलमानला बॅक टू बॅक मिळताहेत धमक्या...

सलमान खानला गेल्या महिन्यात म्हणजेच 18 मार्चला धमकीचा ई-मेल आला होता. गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या नावाने सलमान खानला ही धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी बरारच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली केला. 

'गोल्डी बराड़ को तेरे बॉस यानी सलमान खान से बात करनी है. इंटरव्यू देख लिया होगा उसने शायद, नहीं देखा हो तो बोल दियो देख लेना. मैटर क्लोस करना है तो बात करवा दो. फेस टू फेस करना हो तो वो भी बता दो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दिया है अगली बार झटका ही देखने को मिलेगा...', असा उल्लेख सलमान खानला आलेल्या ई-मेलमध्ये आहे. 

सलमान खान गँगस्टर्सच्या निशाण्यावर...

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून सलमान खान हा गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि गोल्डी बरारच्या निशाण्यावर आहे. दोघांकडून वारंवार सलमान खानला धमक्या मिळत आहेत. इतकंच नाही तर याआधी सलमानचं घर आणि फार्महाऊसची देखील रेकी करण्यात आली होती. तसेच अनेकदा त्यांच्यावर हल्ल्याचा देखील प्रयत्न झाला होता. मात्र,  सलमान खानच्या कडक सुरक्षेमुळे गँगस्टरचा प्लान फेल ठरला होता. 

Prajakta Mali पुन्हा चर्चेत, खासगी फोटो आले समोर...

सलमान खानने माफी मागावी..

सलमान खानने आमच्या समाजाची माफी मागावी, असं लॉरेंस बिश्नोईचं म्हणणं आहे. सलमानचं नाव हरिण शिकार प्रकरणात समोर आलं होतं. तेव्हापासून लॉरेंस बिश्नोई सलमान खानवर नाराज आहे. सलमानला धडा शिकवावा, असा बिश्नोईने निर्धार केल्याचं समजतं. 

ऐश्वर्या-अभिषेकमधील वाद विकोपाला? होऊ शकते काडीमोड!

धमकीच्या ई-मेलवर काय म्हणाला सलमान?

सलमान खान याने गँगस्टर्सकडून मिळालेल्या धमकीनंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. एका अवॉर्ड शोमध्ये सलमान खानला सवाल करण्यात आला होता. तू तर संपूर्ण इंडियाचा भाईजान आहेत. तरी देखील तुला धमक्या मिळत आहे. त्यामुळे तू या सगळ्या प्रकरणाकडे कसा पाहतो. त्यावर सलमान खान म्हणाला, मी संपूर्ण इंडियाचा भाईजान नाही, तर अनेकांच्या हृदयात आहे. माझे असंख्य चाहते आहेत. आता सलमानच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी