सलमानने अचानक केला कॅन्सल आपला अमेरिका दौरा, पाकिस्तान कारण, जाणून घ्या संपूर्ण बातमी 

बॉलिवूड सुपर स्टार (Salman Khan)ने अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये लाइव्ह इव्हेटमध्ये भाग सहभागी होणार होता. तो कार्यक्रमच रद्द केला आहे. 

salman khan cancels us tour due to pakistani organizer entertainment news in marathi
सलमानने अचानक केला कॅन्सल आपला अमेरिका दौरा, पाकिस्तान कारण, जाणून घ्या संपूर्ण बातमी  

नवी दिल्ली :  बॉलिवूड सुपर स्टार (Salman Khan) ने अमेरिकेतील ह्युस्टन शहरात एक लाइव्ह इव्हेंट रद्द केला आहे. सलमान (Salman Khan) हा कार्यक्रम रेहान सिद्दिकी याने आयोजित केल्यामुळे त्यात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेहान पाकिस्तानी नागरिक आहे आणि अमेरिकेत भारत विरोधी कारवायांना फंडीग करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

एका वेबसाईटवर प्रकाशीत बातमीनुसार, ह्युस्टन येथील सिद्दिकी गेल्या अनेक काळातपासून अमेरिकेत स्टार्सचे कार्यक्रम करून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करतो आणि त्याचा उपयोग भारत विरोधी कारवायांसाठी करत असल्याचा आरोप आहे. सिद्दिकी बॉलिवूड ताऱ्यांसह अनेक लाइव्ह कन्सर्ट आयोजित करत आलेला आहे. आता पर्यंत त्याने ४०० पेक्षा अधिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सैफ अली खान, मीकी सिंग, पंकज उदास आणि रॅपर बादशहा देखील सिद्दिकीच्या कार्यक्रमाचा भाग बनलेले आहेत. 

वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सिद्दिकी सध्या ह्युस्टनमध्ये सीएए विरोधी आंदोलन आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. 

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर सलमान खान सध्या आपला रिएलिटी शो 'बिग बॉस' च्या फिनालेच्या तयारीत व्यस्त आहे. लवकरच शोचा विजेता घोषीत होणार आहे. या शिवाय सलमान खानने आपला चित्रपट 'राधे' ची शुटींग सुरू केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी