Samantha Ruth Prabhu: समंथानं खरेदी केलं नवीन घर, EX पती नागा चैतन्य आणि घराचं आहे खास कनेक्शन

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 29, 2022 | 15:38 IST

Samantha Buys New House: घटस्फोटानंतर समंथा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अशा परिस्थितीत ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती आलिशान घर खरेदी केल्यामुळे चर्चेत आहे.

samantha ruth prabhu buy new house
समंथा रूथ प्रभूनं खरेदी केलं नवीन घर  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • साऊथची सुपरस्टार सामंथा रूथ प्रभू (South superstar Samantha Ruth Prabhu) तिच्या बोल्ड लाइफस्टाईल (bold lifestyle) आणि धाडसी निर्णयांसाठी प्रसिद्ध आहे.
  • समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही जोडी सर्वांच्या नजरेत आली.
  • यावेळी समंथा रूथ प्रभू आलिशान घर खरेदी केल्यामुळे चर्चेत आहे.

मुंबई:  Samantha Ruth Prabhu buys house: साऊथची सुपरस्टार सामंथा रूथ प्रभू (South superstar Samantha Ruth Prabhu)  तिच्या बोल्ड लाइफस्टाईल (bold lifestyle) आणि धाडसी निर्णयांसाठी प्रसिद्ध आहे. पण समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही जोडी सर्वांच्या नजरेत आली. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे होण्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. घटस्फोटानंतर ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अशा परिस्थितीत ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती आलिशान घर खरेदी केल्यामुळे चर्चेत आहे.

संमथानं हैदराबादमध्ये एक आलिशान घर घेतले आहे. हे तेच घर आहे जिथे घटस्फोटापूर्वी ती पती नागा चैतन्यसोबत राहत होती. घटस्फोटानंतर दोघांनी हे घर विकले होते पण आता अभिनेत्रीने ते पुन्हा विकत घेतले आहे. या घरासाठी समंथाने मोठी रक्कमही दिली आहे.  हे घर विकत घेण्यासाठी समंथाने खूप पैसे खर्च केल्याचे सांगितले जात आहे. घर खरेदी केल्यावर, समंथाने घराच्या जुन्या मालकाला खूप चांगला नफा करून दिला आहे. 

अधिक वाचा- चक्क वाळवंटी देशात पूर, 'या' देशात पावसानं मोडला 27 वर्षांचा रेकॉर्ड

त्या घरासोबत आहे वेगळंच नातं 

समांथाने हैदराबादमध्ये खरेदी केलेले घर अनेक अर्थाने अभिनेत्रीसाठी खास आहे. समंथा तिच्या एक्स पती नागा चैतन्यसोबत राहत असलेल्या घराच्या मालकाने अलीकडेच उघड केलं की, दोघांनी वेगळे झाल्यानंतर हे घर विकले होतं. पण अभिनेत्रीने मालकाशी बोलून स्वतः घर विकत घेतले. सध्या ती तिच्या घरी आईसोबत राहते.

समंथाचे घर विकत घेण्याबाबत, ज्येष्ठ अभिनेते आणि सिनेनिर्माते मुरली मोहन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, समांथाने हैदराबादमध्ये घर विकत घेतलं, ज्यामध्ये ती घटस्फोटापूर्वी नागा चैतन्यसोबत राहत होती. घटस्फोटानंतर दोघांनी हे घर विकले होते पण आता समंथाने हे घर पुन्हा विकत घेतले आहे आणि आता ती तिच्या आईसोबत येथे राहत आहे. या घरासाठी अभिनेत्रीने मोठी किंमत मोजली आहे. तिला हे घर खूप आवडले आणि तिला त्यात राहायचे होते आणि म्हणूनच तिने हे पाऊल उचललं.

समंथा रुथ प्रभूने करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये खुलासा केला होता की, तिला कधीही अभिनय करण्याची इच्छा नव्हती मात्र कमी पैशामुळे तिने काम करण्यास सुरुवात केली ज्यामुळे मला शिक्षण घेता आलं. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.  

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास समंथा लवकरच यशोदा आणि शकुंतलममध्ये दिसणार आहे. यासोबत ती तापसी पन्नूच्या सिनेमातही दिसणार आहे.

समंथा आणि नागा चैतन्यची जोडी चाहत्यांना खूप आवडायची लग्नाच्या 4 वर्षानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांचे मित्र होते. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 3-4 वर्षे एकमेकांना डेट केले होते, त्यानंतर अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये गोव्याच्या सुंदर ठिकाणी ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग केले होते. मात्र, काही काळानंतर या जोडप्याने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी