'हर हर महादेव' सिनेमावरुन संभाजीराजेंचा संताप, "हा सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित केल्यास...."

Sambhajiraje Chhatrapati oppose to telecast Har Har Mahadev movie on TV: 'हर हर महादेव', 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमांत इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता हर हर महादेव हा सिनेमा टीव्हीवर दाखवण्यात येणार असल्याने संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

Sambhajiraje Chhatrapati oppose to telecast Har Har mahadev movie on tv warn zee studio read in marathi
'हर हर महादेव' सिनेमावरुन संभाजीराजेंचा संताप, "हा सिनेमा टीव्हीवर प्रदर्शित केल्यास...." 
थोडं पण कामाचं
  • हर हर महादेव सिनेमात इतिहासाची मोडतोड केल्याने संभाजीराजेंचा सिनेमावर आक्षेप
  • हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल - संभाजीराजे छत्रपती
  • इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये - संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje Chhatrapati on Har Har Mahadev Movie: 'हर हर महादेव' या सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचं सांगत काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत या सिनेमावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर या सिनेमावरुन मोठा वाद निर्माण झाला. हा वाद सुरू असतानाच आता 'हर हर महादेव' हा सिनेमा टीव्हीवर टेलिकास्ट होणार आहे. टीव्हीवर सिनेमा टेलिकास्ट होत असल्याचं पाहून संभाजीराजेंनी थेट झी वाहिनीला इशारा दिला आहे. (Sambhajiraje Chhatrapati opposes to telecast Har Har mahadev movie on tv warn zee studio read in marathi)

'हर हर महादेव' हा सिनेमा 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर टेलिकास्ट होणार आहे. याला संभाजीराजेंनी जोरदार विरोध केला आहे. त्या संदर्भात संभाजीराजे यांनी झी स्टुडिओज वाहिनीला एक पत्र सुद्धा लिहिलं आहे.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती आपल्या भावना कशा प्रकारे लपवते? तुमची रास कोणती?

काय म्हटलंय पत्रात? 

आपल्या पत्रात संभाजीराजे यांनी म्हटलं, "हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीच्या पद्धतीने सादरीकरण झाले असल्याने या चित्रपटाबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्यात आले होते. या चित्रपटामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या असताना देखील हा वादक्रस्त चित्रपट तुम्ही झी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर प्रदर्शित करीत आहात. शिवभक्तांच्या भावनांशी असा खेळ करणे योग्य नाही. सदरील चित्रपट टेलिव्हिजनवर प्रदर्शित करू नये, असे स्वराज्य संघटना सूचित करीत आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव हा चित्रपट टेलिव्हिजनवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व त्यासाठी पूर्णत: तुम्ही जबाबदार असाल!"

संभाजीराजे यांचं ट्विट

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटही केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, "हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत #स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल..."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी