Sania Mirza Affair: भारताची स्टार टेनिसप्लेअर (Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा धडाकेबाज बॅट्समन शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोघांच्या घटस्फोटाची (Divorce) प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगते आहे. अचानक या कपलच्या जुदाईच्या बातम्या वाचून त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. एका रिपोर्टनुसार तर या दोघांचा घटस्फोटही झाला असून अद्याप तो जाहीर करण्यात आलेला नाही. या दोघांनी बारा वर्षांपूर्वी एकमेकांशी लग्न केलं होतं. 2010 साली या दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा फैसला केला होता. या दोघांना इजहान नावाचा मुलगाही आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दोघांचं पटत नसल्याचं समोर आलं असून दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झानं शोएब मलिकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यापूर्वी तिचा काही बॉलिवूड सेलेब्रिटींवर क्रश असल्याचीही जोरदार चर्चा होती. तिचं नाव प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूरसोबत जोडलं गेलं होतं.
अधिक वाचा - PM Narendra Modi : मी दररोज दोन ते तीन किलो शिव्या खातो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तेलंगाणात वक्तव्य
लग्नापूर्वी काही वर्षे बॉलिवूड स्टार शाहीद कपूर आणि सानिया मिर्झा यांच्यात अफेअर सुरु असल्याची जोरदार अफवा उठली होती. याच विषयावर करन जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करन’ या कार्यक्रमात सानियाला प्रश्न विचारला होता. करणने विचारलं,”इतक्या वर्षात बॉलिवूडमधील एकानेही तुला प्रपोज केलं नाही किंवा तुला अप्रोच केलं नाही?” त्यावर उत्तर देताना सानिया म्हणाली,”माझ्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही.” मग करणने विचारलं, “तुझ्या आणि शाहीदच्या अफेअरबाबतही जोरदार चर्चा रंगली होती. ती खरी होती का?” त्यावर सानियानं दिलेलं उत्तर अफलातून होतं. ती म्हणते,”मला अजिबात आठवत नाही. ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्यासोबत असं काहीच घडलं नाही कारण मी प्रचंड प्रवास करत असते.”
अधिक वाचा - Two planes collide: हवेत दोन विमानांची टक्कर, एअर शोदरम्यान घडला अपघात, Watch Video
त्यानंतर करण जोहरने सानिया मिर्झाला एक प्रश्न विचारला होता. “रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांच्यातील कुणाशी लग्न करायला आवडेल, कुणाशी अफेअर करायला आवडेल आणि कुणाला मारून टाकायला आवडेल?” त्यावर तिने उत्तर दिलं होतं,”मला रणबीर कपूरसोबत लग्न करायला, शाहीद कपूरसोबत अफेअर करायला आणि रणवीर सिंगला मारून टाकायला आवडेल.” त्यानंतर चाहत्यांमध्ये या विषयावरून जोरदार चर्चा रंगली होती. अर्थात, हा काल्पनिक प्रश्न होता आणि त्याला सानिया मिर्झाने दिलेलं हे काल्पनिक उत्तर होतं. मात्र आता तिच्या ब्रेकअपनंतर आणि घटस्फोटाच्या चर्चेनंतर तिच्या जुन्या व्हिडिओची पुन्हा एकदा चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.