Sanjay Kapoor Home seal : अभिनेता संजय कपूरच्या पत्नीला कोरोनाची लागण, पालिकेकडून घर सील, करण जोहरच्या मातोश्रींची कोरोना चाचणी

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे पालिकेने संजय कपूरचे घर सील केले आहे. करीना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण झाल्यामुळे पालिकेने दोघी राहत असलेल्या इमारती सील केल्या आहेत. Sanjay Kapoor wife corona positive home sealed by bmc

sanjay kapoor karan johar
संजय कपूर 
थोडं पण कामाचं
  • अभिनेता संजय कपूरच्या पत्नीला कोरोनाची लागण
  • मुंबई महानगरपालिकेकडून संजय कपूरचे घर सील
  • करण जोहरच्या मातोश्रींची कोरोना चाचणी

Sanjay Kapoor Home seal : मुंबई : अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे पालिकेने संजय कपूरचे घर सील केले आहे. करीना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण झाल्यामुळे पालिकेने दोघी राहत असलेल्या इमारती सील केल्या आहेत. करीना कपूर आणि अमृता आरोरा या दोघी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या एका पार्टीत गेल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघींना कोरोना झाल्यानंतर पालिकेने पार्टीत आलेल्यांची तब्बल ४० जणांची आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. (Sanjay Kapoor wife corona positive home sealed by bmc)

करण जोहर आणि त्यांच्या आई हिरू जोहर यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यात करण जोहरची टेस्ट निगेटिव्ह आली असून हिरू जोहर यांच्या टेस्टचा रीपोर्ट येणे बाकी आहे.  मंगळवारी सकाळी पालिकेच्या कर्मचार्‍यांनी करण जोहर, करीना कपूर आणि अमृता अरोरा राहत असलेल्या इमारती सॅनिटाईझ केल्या आहेत. 

सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि तिचाअ मुलगा योहान खानही हे करीना कपूर आणि अमृता अरोराच्या संपर्कात आले होते. त्यामुळे दोघेही होम क्वारंटाईन आहेत. करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाल्यानंतरही दोघींनी नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी गेल्या असा दावा पालिकेने केला होता. त्यानंतर करीना कपूरच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण देत करीनाने नेहमीच कोविड नियमांचे पालन केले असल्याचे म्हटले आहे.  एका खासगी पार्टीत गेल्यानंतर करीनाला कोरोना लागण झाली, करीनाने बाहेर पडताना नेहमीच नियम पाळले आहेत. दुर्दैवाने एका डिनर पार्टीत करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाल्याचे करीनाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तसेच या पार्टीत एका व्यक्तीची तब्येत ठीक नव्हती, ही व्यक्ती सारखी खोकत होती, त्यामुळे कोरोनाचा विषाणू पसरला. या व्यक्तीमुळेच करीना आणि अमृताला कोरोनाची लागण झाल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे. करीना सध्या होम क्वारंटाईन असून सर्व उपचार घेत आहे. तिला आता बरे वाटत असून ती पालिका प्रशासनाला सर्व सहकार्य करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी