Krushna Abhishek: 'The Kapil Sharma Show'मध्ये नसणार 'सपना का मसाज पार्लर' शोमधून कृष्णा अभिषेकची एक्झिट

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 23, 2022 | 12:57 IST

Krushna Abhishek quits The Kapil Sharma Show: कृष्णा अभिषेकच्या (Krushna Abhishek) चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. कारण शोमध्ये 'सपना' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता कृष्णा पुढच्या सीझनमध्ये दिसणार नाही आहे.

Krushna Abhishek not be part In The Kapil Sharma Show
कृष्णा अभिषेकचा The Kapil Sharma Show ला रामराम 
थोडं पण कामाचं
  • द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) नवीन सीझनसह टेलिव्हिजनवर कमबॅक (New Season) करण्यासाठी सज्ज झाला आहे.
  • काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कलाकार आणि क्रूने प्रोमोसाठी शूटिंग केलं आहे.
  • मात्र या शोचे आणि कृष्णा अभिषेकच्या (Krushna Abhishek) चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे.

मुंबई: Krushna Abhishek quits The Kapil Sharma Show, reveals reason: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show)  नवीन सीझनसह टेलिव्हिजनवर कमबॅक (New Season) करण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कलाकार आणि क्रूने प्रोमोसाठी शूटिंग केलं आहे. होस्ट कपिल शर्मा (Kapil Sharma)  आणि अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh)  यांनी प्रोमो शूटमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केल आहेत. मात्र या शोचे आणि कृष्णा अभिषेकच्या (Krushna Abhishek) चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. कारण शोमध्ये 'सपना' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता कृष्णा पुढच्या सीझनमध्ये दिसणार नाही आहे. दरम्यान आता द कपिल शर्मा शोमधून कृष्णा अभिषेकनं एक्झिट घेण्याचं कारण अखेर समोर आले आहे. 

द कपिल शर्मा शो सप्टेंबरपासून टीव्हीवर टेलीकास्ट होणार आहे. यामुळे प्रेक्षकांना पुन्हा हास्याचा डबल डोस मिळणार आहे. पण त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये काहीशी नाराजी ही आहे. कारण या शोमध्ये कृष्णा अभिषेक दिसणार नाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, पण आता कृष्णानेच तो या शोच्या आगामी सीझनचा भाग नसणार असल्याचा खुलासा केला आहे. 

अधिक वाचा-  मुंबईला पुन्हा एकदा धमकी, प्रसिद्ध ललित हॉटेल बॉम्बनं उडवून देऊ; पोलीस सतर्क

शोमध्ये दिसणार नाही 'सपना का पार्लर'

सपनाच्या भूमिकेवरून कृष्णा हा घराघरात प्रसिद्ध झाला. साहजिकच शोमधील प्रत्येकजण सपनाच्या भूमिकेला खूप मिस करणार आहे.  सपनाच्या भूमिकेनं एक वेगळीच ओळख दिली असल्याचं खुद्द कृष्णानं म्हटलं आहे. कृष्णाने सांगितले की, कॉन्ट्रॅक्टच्या समस्येमुळे त्याला शोमधून बाहेर पडावं लागलं. तो स्वतः ही हे सर्व मिस करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

कपिलचा नवा लूक

दुसरीकडे, कपिलने शोच्या प्रोमो शूटसाठी आपला नवीन लुक शेअर केला आहे. जिथे तो स्लीक आणि स्टायलिश दिसत आहे. त्याचा लूक त्याची पत्नी गिन्नी चतरथने स्टाईल केला आहे. त्याने फोटोला कॅप्शन दिले, "नवीन सीझन, नवीन रूप #tkss #comingsoon." 

"द कपिल शर्मा शो" सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर परतण्याची अपेक्षा आहे आणि त्यात अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि भारती सिंग असणार आहेत. तर अर्चनाने सुद्धा बीटीएस व्हिडिओची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी