Sara Ali Khan | नवी दिल्ली : बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) अनेकदा तिच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखली जाते. कालांतराने तिचा चाहता वर्ग खूप वाढत गेला. काही कालावधीपूर्वी या अभिनेत्रीच्या नाकावर दुखापत झाली होती. ज्यानंतर बरेच चाहते काळजीत पडले होते आणि आता पुन्हा एकदा सारा दुखापतीपासून थोडक्यात बचावली आहे. तिच्या तोंडासमोरच बल्ब फुटला अन् सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. (Sarah Ali khan briefly survived the accident bulb exploded in front of her during makeup).
सारा अली खानसोबत चित्रपटाच्या सेटवर मेकअप रूममध्ये एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे अभिनेत्री खूपच घाबरली होती. खरंतर सारा अली खान मेकअप रूममध्ये टचअप घेत होती आणि तेव्हाच तिच्या चेहऱ्याजवळचा बल्ब फुटला. सारा अचानक घाबरली आणि त्या आवाजाने कॅमेराही खाली पडला.
हा प्रकार रविवारी झाला, ज्याचा व्हिडिओ सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर (Sara Ali Khan Instagram) शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सारा टचअप घेताना म्हणते आहे की, "जीतूला नारळपाणी आणायला सांगा." यादरम्यान मेकअप आर्टिस्ट टचअप करून निघून जाताच, सारा कॅमेऱ्यात स्वतःचे कौतुक करू लागते. मग बल्ब फुटतो आणि त्याचा स्फोट होतो. अन् सारा घाबरून जाते.
हा व्हिडिओ शेअर करत साराने लिहिले आहे, "अशी सकाळ' सोबतच दोघांनी मिळून इमोजी बनवले आहेत, ज्याद्वारे ती किती घाबरली होती हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सारा अली खान सध्या इंदौरमध्ये आहे, जिथे ती लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) देखील आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) स्टारर 'लुका छुप्पी'चा सीक्वल असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.
वर्क फ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर सारा अली खानचा शेवटचा चित्रपट अतरंगी रे हा होता. धनुषसोबत तिची उत्कृष्ट केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळाली. अक्षय कुमारसोबतचा तिचा रोमान्सही चर्चेत राहिला होता. जसजसा वेळ जात आहे, तसतशी सारा तिच्या अभिनयाने चाहत्यांना प्रभावित करताना दिसत आहे. अतरंगी रे चित्रपटातील त्यांचे चका चक हे गाणे आजही चाहत्यांच्या मनात आहे आणि लोक त्यावर भरपूर परफॉर्म करत आहेत.