रजनीकांतच्या माजी जावयाने कहरच केला राव, सासऱ्याचाही रेकॉर्ड मोडतोय धनुष राव!

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 19, 2022 | 14:34 IST

द ग्रे मॅन (The Gray Man) हा सुपरस्टार धनुषचा (Superstar Dhanush) सिनेमा नेहमीच आणि सतत चर्चेत असतो.

Dhanush
रजनीकांतच्या माजी जावयाचा कहर, सासऱ्याचाही रेकॉर्ड मोडतोय पठ्ठ्या! 
थोडं पण कामाचं
  • द ग्रे मॅन (The Gray Man) हा सुपरस्टार धनुषचा (Superstar Dhanush) सिनेमा नेहमीच आणि सतत चर्चेत असतो.
  • रूसो ब्रदर्स या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
  • साऊथचा सुपरस्टार असलेला अभिनेता धनुषसोबत बनलेला हा नेटफ्लिक्सचा आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असल्याचं बोललं जात आहे.

नवी दिल्ली: South Movies News: द ग्रे मॅन (The Gray Man) हा सुपरस्टार धनुषचा (Superstar Dhanush)  सिनेमा नेहमीच आणि सतत चर्चेत असतो. रूसो ब्रदर्स या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. रूसो ब्रदर्सनी 'Avengers: Endgame' या मार्वल सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. साऊथचा सुपरस्टार असलेला अभिनेता धनुषसोबत बनलेला हा नेटफ्लिक्सचा आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमातल्या एका सिनसाठी तब्बल 319 कोटी रूपये खर्च करण्यात आलेत. 

सिनेमा बनवण्यासाठी तब्बल 1600 कोटी रूपये खर्च 

या सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासाठी नेटफ्लिक्सकडून रूसो ब्रदर्सला सुमारे 1600 कोटी रूपये देण्यात आले होते. या सिनेमाचे जगभरातील सर्वोत्तम लोकेशन्सवर निर्मात्यांनी शूटिंग केलं आहे.  बेस्ट लोकेशन्सवर शूटिंग करण्याकरिता खूप मेहनत आणि भरपूर पैसे ही खर्च झाले आहेत. शूटिंगदरम्यानचा अनुभव शेअर करताना रूसो ब्रदर्स म्हणाले की, या सिनेमानं जवळपास आमचा जीव घेतला. 

अधिक वाचा-  RBI चा महाराष्ट्रातील  'या' सहकारी बँकेला दणका; काढता येणार फक्त इतके पैसे

OTT पूर्वी रिलीज होणार थिएटर्समध्ये 

हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. मात्र याशिवाय हा सिनेमा अमेरिकेतल्या काही थिएटर्समध्ये ही रिलीज होईल. 

समोर आलेल्या बातम्यांनुसार, जेम्स बाँड आणि मिशन इम्पॉसिबलच्या फिलिंग्ससोबत हा सिनेमा बनवण्यात आला आहे. हा एक स्पाय फ्रँचायझी सिनेमा आहे ज्याला निर्माते आणखी पुढे वाढवू शकतात. हा सिनेमा हिट ठरला तर येत्या काळात ग्रे युनिव्हर्सचे आणखी सिनेमे प्रेक्षकांना पाहता येतील.

धनुषसोबत असतील हॉलिवूड सुपरस्टार 

सिनेमाच्या स्टार कास्टनंतर बोलायचं झालं तर सिनेमाचे सीन आणि त्याचे पोस्टर आधीच प्रचंड व्हायरल होत आहेत. हॉलिवूड स्टार रायन गोसलिंग, ख्रिस इव्हान्स, अॅना डी अमरेस आणि रेगे जॉन पेज या सिनेमात दिसणार आहेत. सिनेमा रिव्ह्यूबद्दल बोलायचं तर आतापर्यंत सर्वांनी सिनेमातील धनुषच्या कामाचं कौतुक केलं आहे. मात्र चाहते OTT वर हा सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी