SRK Video: सेल्फी घेण्यासाठी चाहत्याचं धक्कादायक कृत्य, संतापला Shah Rukh Khan; आर्यननं केली मध्यस्थी

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 08, 2022 | 10:14 IST

Shah Rukh Khan Viral Video:शाहरूख खानचा मुंबई विमानतळावरील (Mumbai airport) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shah Rukh khan
शाहरूख खान  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • शाहरूख खानचा मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • शाहरूख बाहेर येत असताना अभिनेत्याचा चाहता त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे आला.
  • पापाराझी व्हायरल भयानी यांनी शाहरुखचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

मुंबई: Bollywood Actor Shah Rukh Khan Airport Video Viral: बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान (Shah Rukh Khan) लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र शाहरूख खानचा मुंबई विमानतळावरील (Mumbai airport)  एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरूख खान आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजे आर्यन (Aryan)  आणि अबराम खान (AbRam Khan) सोबत विमानतळावर दिसत आहे. तिघेही मुंबई विमानतळावरून बाहेर येत असताना पापाराझीनं त्यांना स्पॉट केलं. पण त्याचवेळी असं काही झालं की शाहरूख एका व्यक्तीवर संतापलेला दिसला. मात्र आर्यननं मध्यस्थी करत ते प्रकरण शांत केलं.. 

नेमकं विमानतळावर शाहरूखसोबत काय घडलं

शाहरूख बाहेर येत असताना अभिनेत्याचा चाहता त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे आला. मात्र त्या चाहत्यानं सेल्फी काढण्यासाठी त्याला जबरदस्तीनं हात पकडून रोखण्याचा प्रयत्न केला. चाहत्याच्या या कृत्यानं शाहरूख भलताच रागावला. पण आर्यन खाननं मध्यस्थी घेत शाहरूख खानला शांत केलं. त्याच दरम्यान शाहरूखची टीम त्या व्यक्तीला त्याच्याकडे पुन्हा शाहरुखकडे जाण्यापासून रोखताना दिसली.

अधिक वाचा-  आता बेस्ट बसचा प्रवास आणखीन सुखकर, तिकीट खरेदी प्रक्रियेत मोठा बदल

पापाराझी व्हायरल भयानी यांनी शाहरुखचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान ब्लॅक जॅकेट आणि बी ट्रॅक पॅन्टसह व्हाइट टी शर्ट घालून स्पॉट झाला. तर यावेळी आर्यननं निळ्या रंगाचं टी शर्ट आणि ब्राउन पॅन्ट घातलेला दिसला. अबराम लाल रंगाचा ड्रेस घालून स्पॉट झाला.

शाहरुख खाननं विमानतळावरून बाहेर येत असताना अबरामचा हात आपल्या हातात पकडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आर्यन त्यांच्यासोबत चालत होता. त्याचवेळी एकजण अचानक येतो आणि शाहरुखचा हात धरून थांबून एकत्र सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर शाहरुख पकडन गोंधळून मागे हटतो. हे पाहून अब्रामही घाबरतो. शाहरूख राग आल्याचं बघताच आर्यन त्याला शांत करतो. त्यानंतर शाहरुखची सुरक्षा टीम त्या व्यक्तीला तिथून बाजूला करते.

शाहरूखचे अपकमिंग प्रोजेक्ट 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर, शाहरुख खान सध्या 'डंकी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्याने तापसी पन्नूसोबत सिनेमाचं शेड्यूल पूर्ण केलं आहे आणि तो भारतात परतला आहे. हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सिनेमाच्या सेटवरून अनेक फोटो आणि व्हिडिओही लीक झाले आहेत. राजकुमार हिरानी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय शाहरुख 'पठाण' आणि 'जवान'मध्येही दिसणार आहे. पठाण सिनेमा जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर दिग्दर्शक एटलीसोबत जवान या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शाहरुख खानचा जवान 2 जून 2023 रोजी हिंदी तसेच तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी