मुंबई: Shahrukh Khan Unseen Dance Video: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) यांची प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. शाहरूख खानची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. गेल्या बऱ्याच काळापासून शाहरूख मोठ्या पडद्यापासून दुरावला आहे. अशा परिस्थितीत चाहते शाहरूखच्या कमबॅकची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र आता शाहरूख खानने काही दिवसांपूर्वी पठाण (Pathan), जवान (Jawan) आणि डंकी (Dunky) या सिनेमाची घोषणा करून चाहत्यांना एक्साइटिड केलं. दरम्यान, शाहरुख खानचा एक न पाहिलेला डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहरूख खानचा डान्स व्हिडिओ
शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान 'ना जा' या पंजाबी गाण्यावर काही लोकांसोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये थोडासा अंधार दिसत आहे.
MUST WATCH — Deepak ✌️ (@iamDeepakSRKian) August 5, 2022
.
.
KING KHAN @iamsrk Dancing Video Is Making Your Friday More Perfect
.
.#Srk #ShahRukhKhan #Pathaan #Jawan #Dunki pic.twitter.com/rCRT4k8OvO
एका पार्टीतला हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे. पण ज्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्यानुसार हा थ्रोबॅक व्हिडिओ आहे. जो झिरो सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आहे. सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडिओ खूप आवडत असून बऱ्याच जणांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.
अधिक वाचा- मुंबई लोकल संदर्भातली सर्वांत मोठी बातमी, उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या Timetable
शाहरुख खानचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
शाहरुख खान पठाण या सिनेमातून कमबॅक करत आहे. पठाण जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
याशिवाय शाहरुख खानने राजकुमार हिरानीसोबत डंकी या सिनेमाचीही अधिकृत घोषणा केली आहे. या सिनेमात शाहरुख खानसोबत तापसी पन्नूची जोडी आहे. हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
या दोन सिनेमांशिवाय शाहरुख दिग्दर्शक एटलीसोबत जवान या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शाहरुख खानचा जवान 2 जून 2023 रोजी हिंदी तसेच तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.