Doraemon Cartoon । मुंबई : नुकत्याच प्रसिध्द झालेल्या बातम्यांनुसार, प्रसिद्ध जपानी मंगा कलाकार फुजिको फुजिओ ए (Faujiko Fujio A) यांचे निधन झाले आहे. निन्जा हातोडी आणि लिटिल घोस्ट क्यू-टारो यांसह लहानग्यांच्या कार्टूनसाठी प्रसिध्द असलेल्या फुजिको फुजिओ ए यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तेथील स्थानिक माध्यमांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली. (Shocking Doraemon creator Fujiko Fujio A dies).
लक्षणीय बाब म्हणजे चिमुकल्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलाकाराचे खरे नाव मोटू अबिको असून ते गुरूवारी टोकियो येथील त्यांच्या घराबाहेर सापडले. कलाकाराच्या निधनाची बातमी समजताच अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
अधिक वाचा : लिंबाच्या किमती वाढल्याने भन्नाट मिम्स व्हायरल
अबिकोचे वडील मध्य टोयामा प्रदेशातील ऐतिहासिक मंदिरात एक भिक्षू होते. अबिको हा त्यांचा मोठा मुलगा होता. मात्र वडीलांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबासह मंदिरही सोडले. त्यावेळी ते इयत्ता पाचवीत होते. २०२० मध्ये याबाबत माध्यमांशी बोलताना अबिको म्हणाले होते की, "माझ्या वडीलांच्या मृत्यूने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तसेच जर त्यांचे निधन झाले नसते तर मला वाटते मी देखील संन्यासी झालो असतो."
फुजिको फुजिओ ए यांची हायस्कूलच्या दिवसात हिरोशी फुजीमोटोशी मैत्री झाली, त्यानंतर त्यांनी जपानचे बहुचर्चित कार्टून डोरेमॉन तयार केले आणि कार्टूनच्या भरघोस यशानंतर या जोडीने एकत्र काम करण्यास सुरूवात केली.