Shradha Kapoor: श्रद्धा कपूर लग्न करणार? पाहा वडील शक्ती कपूर यांनी काय उत्तर दिलंय

झगमगाट
Updated Jul 12, 2019 | 17:52 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Shradha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा बालमित्र रोहन श्रेष्ठ यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. रोहन आणि श्रद्धा दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून, २०२०मध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे समजते.

Shradha Kapoor Shakti Kapoor
श्रद्धा कपूर लग्न करणार?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • श्रद्धा कपूरच्या लग्नाची अफवा
  • बालमित्राला दोन वर्षांपासून श्रद्धा करतेय डेट
  • शक्ती कपूर म्हणतात, 'मला लग्नाचं आमंत्रण विसरू नका'

मुंबई : आशिकी २, एक व्हिलन, बागी, हाफ गर्ल फ्रेंड, एबीसीडी २, सारख्या सिनेमांमधून पडद्यावर आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर लग्न करणार असल्याची सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे. मध्यंतरी फरहान अख्तरसोबत तिचं नाव जोडलं जात होतं. ‘रॉक ऑन २’मध्ये फरहान आणि श्रद्धा यांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. पण, श्रद्धाचं ते अफेअर केवळ चर्चेचाच विषय ठरला. फरहान सध्या शिबानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. इकडे श्रद्धाची तिचा बालमित्र रोहन श्रेष्ठसोबत लग्नाची चर्चा सुरू आहे. रोहन आणि श्रद्धा सध्या रिलेशनशिपमध्ये असून, २०२०मध्ये दोघे लग्न करण्याचा विचार करत असल्याचे समजते. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी मात्र तिच्या लग्नाचं वृत्त फेटाळून लावलंय. शक्ती कपूर यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. ‘खरचं माझ्या मुलीचं लग्न होतंय? कृपया मला आमंत्रण द्यायला विसरू नका,’ अशी प्रतिक्रिया शक्ती कपूर यांनी दिली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

??

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

 

 

 

दोन वर्षांपासून डेटिंग

शक्ती कपूर यांना ज्यावेळी माध्यमांनी श्रद्धाच्या लग्नाविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘मला हे पण सांगा की श्रद्धाचं लग्न कुठं आहे, मी तिथं पोहचेन. मी त्या मुलीचा वडील आहे आणि तरीही मला त्याविषयी काहीच माहिती नाही. त्यामुळं मला तुम्ही सांगितलं पाहिजे.’ मुंबईतील एका वर्तमानपत्रात याविषयी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आणि ही चर्चा व्हायरलही झाली. वर्तमानपत्रात श्रद्धा आणि रोहन पुढच्या वर्षी लग्न करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. हे दोघे दोन वर्षांपासून डेटिंग करत असल्याची चर्चा आहे. पण, श्रद्धा सध्या तिच्या आगामी साहो सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी एक्सायटेड आहे. तेलुगु सुपरस्टार प्रभाससोबत श्रद्धा पहिल्यांदाच काम करत आहे. विशेष म्हणजे बाहुबली-२नंतर प्रभासचा हा पहिला सिनेमा असल्यामुळं त्याची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा येत्या १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The teaser is out on June 13th! #SAAHO #15thAugWithSaaho @actorprabhas @sujeethsign ❤️?

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Last day of the Dubai schedule @varundvn ?? #STREETDANCER3D @remodsouza #PrabhuDeva @norafatehi ?

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

 

श्रद्धाला मोठ्या यशाची प्रतीक्षा

श्रद्धानं बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी, तिला अपेक्षित यश मिळालेलं नाही. तिचे सिनेमे माफक कमाई करून देतात, असा शिक्का तिच्यावर बसला आहे. श्रद्धाच्या जनरेशनमधली आलिया भट आव्हानात्मक भूमिका करताना दिसत आहे. पण, श्रद्धाकडे हसीना पारकर वगळता, तशी आव्हानात्मक भूमिका आली नाही. हसीना पारकरच्या भूमिकेविषयी श्रद्धाच्या प्रयत्नांचं कौतुक झालं असलं तरी त्याला कमिर्शियल यश मिळालं नाही. श्रद्धाकडे सध्या साहो सिनेमाशिवाय 'स्ट्रीट डांसर 3डी' आणि 'छिछोरे' हे सिनेमे आहेत. त्यात ती वरुण धवन आणि सुशांत सिंग रजपूतसोबत काम करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Shradha Kapoor: श्रद्धा कपूर लग्न करणार? पाहा वडील शक्ती कपूर यांनी काय उत्तर दिलंय Description: Shradha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि तिचा बालमित्र रोहन श्रेष्ठ यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. रोहन आणि श्रद्धा दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून, २०२०मध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे समजते.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola