तारीख ठरली, 'ठिकाणं बदललं'; सिद्धार्थ-कियारा चंदीगडमध्ये अडकणार लग्नबंधनात

Sidharth-Kiara: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. या दोघांची जोडी आजकाल त्यांच्या नात्यामुळे मीडियाच्या चर्चेत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे समजते.

Siddharth-Kiara will get married in Chandigarh
तारीख ठरली, 'ठिकाणं बदललं'; सिद्धार्थ-कियारा चंदीगडमध्ये अडकणार लग्नबंधनात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
  • चंदीगडमध्ये पार पडणार विवाह सोहळा
  • ओबेरॉय सुखविला रिसॉर्ट ठरावीत लोकांनाच निमंत्रण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी अनेकदा त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. दरम्यान, आता लग्नाबाबत आणखी एक नवीन अपडेट समोर आले आहे. दोघेही लग्नासाठी चंदीगडमधील लोकेशन पाहत असल्याचे बोलले जात आहे. (Siddharth-Kiara will get married in Chandigarh)

अधिक वाचा : Boycott Pathan trend: 'पठाण' फ्लॉप करण्यासाठी सुशांत सिंगच्या चाहत्यांनी कंबर कसली, सोशल मीडियावर Pathan ला Boycott करण्याची मागणी

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्राच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “दोघेही एका महिन्यापासून लग्नाचे ठिकाण शोधत होते. कियारा आणि सिद्धार्थ सध्या चंदीगडमध्ये एका लक्झरी प्रॉपर्टीच्या शोधात आहेत. लग्नासाठी चंदीगडमधील ओबेरॉय सुखविला स्पा आणि रिसॉर्टसाठी आग्रही आहेत. याच रिसॉर्टमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखाचे लग्न झाले होते.

अधिक वाचा : Deepika Padukone and Ranveer Singh: भर समुद्रात दीपिका पदुकोणने रणवीर सिंगच्या थोबाडीत मारली? सोशल मीडियावर video viral

सूत्राने पुढे सांगितले की, 'असेही म्हटले जात आहे की आधी दोघेही गोव्यात लग्न करण्याचा विचार करत होते,नंतर त्यांनी  गोव्याचा विचार सोडला. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार कियारा आणि सिद्धार्थने डिसेंबरमध्ये त्यांच्या लग्नाची तारीख लॉक केली आहे. लग्नानंतर दोघेही मुंबईत रिसेप्शन पार्टी ठेवणार असल्याचे बोलले जात आहे, ज्यात करण जोहरसह अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित राहणार आहेत. लग्नाची पूर्ण तयारी केल्यानंतरच ते अधिकृत घोषणा करतील.

अधिक वाचा : Vedat Veer Daudale Saat : आता खिलाडी अक्षय साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, फर्स्ट लूक रिलीज

सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो अखेरचा अजय देवगणच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'थँक गॉड' चित्रपटात दिसला होता. याशिवाय तो लवकरच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या सिरीजमध्ये दिसणार आहे. ही मालिका Amazon Prime वर रिलीज होणार आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ आणि कियाराबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही २०२१ मध्ये 'शेरशाह' चित्रपटात एकत्र दिसले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी