नवी दिल्ली: प्रत्येकाला 90 व्या दशकातला बाजीगर सिनेमा नक्कीच आठवत असेल. शाहरूख खान (Shah rukh Khan) आणि काजोल (Kajol) स्टारर सिनेमा बाजीगर (Baazigar) त्यावेळी सुपरहिट झाला होता. या सिनेमातील छुपाना भी नहीं आता हे गाणं हिट झालं होतं. आजही लोकं या गाण्याला पसंती देतात. हे गाणं ऐकल्यावर अभिनेता सिद्धार्थ रे (Siddharth Ray) सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. हे गाणे काजोल, शाहरुख खान आणि अभिनेता सिद्धार्थ रे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या सिनेमात सिद्धार्थ काजोलचा जवळचा मित्र आणि पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. ज्याला काजोलवर मनापासून प्रेम असते पण ते त्याला सांगता येत नाही. या सिनेमात करण मल्होत्राच्या भूमिकेत सिद्धार्थ सर्वांनाच चांगलाच आवडला होता.
सिद्धार्थने साऊथची अभिनेत्री आणि अक्षय कुमारची सौगंध सिनेमातील पहिली अभिनेत्री शांतीप्रियासोबत लग्न केलं होतं. त्यांना दोन मुले आहेत. सिद्धार्थ रे आता या जगात नाहीत. हृदयविकाराच्या झटक्याने खूप कमी वयातच त्यांचं निधन झाले, पण चाहते आजही त्यांची आठवण काढतात. सिद्धार्थ रे यांचा मुलगा शिष्या आता मोठा झाला आहे.
शिष्या सध्या पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सिनेमांमध्ये काम करत आहे. शिष्या रे याचा लेटेस्ट फोटो बघून चाहते आश्चर्यचकित झालेत. शिष्या मोठा होऊन वडिलांसारखाच दिसू लागला आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याने त्याचे लहानपणीचे फोटो आणि आई-वडिलांचे फोटोही शेअर केले आहेत. शिष्याचा लेटेस्ट फोटो पाहून लोकांना बाजीगरमधील करण मल्होत्राची आठवण येत आहे.
अधिक वाचा- अमेरिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या परेडवर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू, 57 जखमी
सिद्धार्थ रे यांचा जन्म मुंबईतील मराठी-जैन कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही शांताराम होते. जे बॉलीवूडमधील एक मोठे नाव आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले. सिद्धार्थ यांना लहानपणापासूनच सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा होती, त्यानंतर त्याचे आजोबा व्ही शांताराम यांनी 1977 मध्ये चानी हा मराठी सिनेमा बनवला, ज्यातून सिद्धार्थने पदार्पण केलं. सिद्धार्थ यांनी मराठीत अनेक सिनेमे केले, मात्र त्याला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला. 1980 मध्ये सिद्धार्थ यांनी शबाना आझमी आणि राजेश खन्ना स्टारर 'थो सी बेवफाई' या सिनेमात काम केले. यामध्ये सिद्धार्थच्या सोबत पद्मिनी कोल्हापुरी होती.
अधिक वाचा- महागड्या बाईकसाठी घेतलं मित्राकडून कर्ज, उधारी फेडण्यासाठी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव
सिद्धार्थचे खरे नाव सुशांत रे होते, मात्र त्यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी आपले नाव बदलले. गंगा का वचन, वंश, युद्धपथ, परवाने, बाजीगर, मिलिट्री राज, बिच्छू, पिता, जानी दुश्मन: एक अनोखी प्रेम कहानी आणि चरस: अ ज्वॉइंट ऑपरेशन असे अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने पत्नी आणि दोन मुलांना सोडून या जगाचा निरोप घेतला.