Yearender : दिलीप कुमार, सिद्धार्थ शुक्ला आणि नटू काका, 2021 मध्ये या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप 

काही दिवसांतच २०२१ हे वर्ष सरणार असून जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणार आहे. पण २०२१ मध्ये आपण अनेक लोकांना गमावले आहे. त्यात चित्रपसृष्टीतल्या कलाकारांचाही समावेश आहे. २०२१ मध्ये कुठल्या कलाकाराने जगाचा निरोप घेतला त्याचा आढावा घेऊया.

dilip kumar
दिलीप कुमार 
थोडं पण कामाचं
  • या वर्षीचा सर्वाधिक धक्का देणारा मृत्यू म्हणजे सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू होता.  
  • या वर्षात आणखी एक धक्का देणारा मृत्यू म्हणजे पुनीथ राजकुमारचे अकाली निधन
  • नटू काका म्हणून  घराघरात पोहोचलेले घनश्याम नाईक यांचे कर्करोगामुळे निधन झाले

काही दिवसांतच २०२१ हे वर्ष सरणार असून जग नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणार आहे. पण २०२१ मध्ये आपण अनेक लोकांना गमावले आहे. त्यात चित्रपसृष्टीतल्या कलाकारांचाही समावेश आहे. २०२१ मध्ये कुठल्या कलाकाराने जगाचा निरोप घेतला त्याचा आढावा घेऊया.

दिलीप कुमार

, President, Prime Minister Amitabh Bachchan tweeted a tribute
हिंदी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ७ जुलै रोजी जगाचा निरोप घेतला. कुमार यांचे मूळ नाव युसुफ खान होते. त्यांना बॉलिवूडचे पहिले खानही म्हटले जायचे. ५४ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले.  दिलीप कुमार यांना आठ वेळा फिल्मेफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड हळहळला होता.


सिद्धार्थ शुक्ला


या वर्षीचा सर्वाधिक धक्का देणारा मृत्यू म्हणजे सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू होता.  २ सप्टेंबर रोजी अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. टीव्हीवरील मालिका आणि रिऍलिटी शोच्या माध्यमातून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सिद्धार्थने हम्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते.


पुनीथ राजकुमार


या वर्षात आणखी एक धक्का देणारा मृत्यू म्हणजे पुनीथ राजकुमारचे अकाली निधन. पुनीथने २९ चित्रपटांत बालकलाकारची म्हणून भूमिका केली होती. कानडी चित्रपटात तो पॉवर स्टार म्हणून ओळखला जायचा. २९ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने पुनीथचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.


घनश्याम नाईक

Ghanshyam Nayak aka Nattu Kaka

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील नटवरलाल उर्फ नटू काका म्हणून  घराघरात पोहोचलेले घनश्याम नाईक यांचे कर्करोगामुळे निधन झाले. गुजराती नाटकातून त्यांनी अनेक भुमिका केल्या. त्यांनी हम दिल दे चुके सनम, क्रांतीवीर या हिंदी चित्रपटातही काम केले होते. परंतु तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील नटू काकामुळे त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. कर्करोगामुळे ३ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले 


सुरेखा सिक्री

Surekha Sikri

सुरेखा सिक्री यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. बालिका वधूतील दादीसाची भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. तसेच बधाई हो चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. १६ जुलै रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.


अमित मिस्त्री

Amit Mistry passes away
वयाच्या अवघ्या  ४७ व्या वर्षी अमित मिस्त्री या अभिनेत्याचे कार्डियेक अरेस्टमुळे निधन झाले. अमितने गुजराती नाटकातून आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून त्याने नाव कमावले होते


अनुपम श्याम

अनुपम श्याम हे हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील मोठं नाव होतं. त्यांनी लगान, हल्ला बोल, संघर्ष, हजारो ख्वाहिशे ऐसी या चित्रपटात काम केले होते. तर मन की आवाज प्रतिग्या मालिकेतील ठाकूर भुमिकेमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. 

राज कौशल

दिग्दर्शक आणि  निर्माते राज कौशल यांचे वयाच्या वघ्या ५०व्या वर्षी निधन झाले. राज कौशल हे अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती, त्यांनी प्यार में कभी कभी, शादी का लड्डू या चित्रपटांचे दिग्दर्शन आणि माय ब्रदर निखिल या चित्रपटाची निर्मिती केली होती. 

राजीव कपूर


कपूर घराण्यातील राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राम तेरी गंगा मैली चित्रपटामुळे त्यांना मुख्य भूमिका बजावली होती. तसेच १९९६ साली प्रेमग्रंथ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी