Dev Patel knife fight : हाॅलिवूड अभिनेता देव पटेल आठवतोय? तोच 'स्लमडॉग मिलेनियर' हिरो? तोच देव पटेल आता सोशल मीडियावर हिरो बनला आहे, सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. वास्तविक भारतीय वंशाच्या देव पटेल याने ऑस्ट्रेलियातील एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. एवढेच नाही तर पोलीस येईपर्यंत जखमी व्यक्तीला संरक्षण देण्यासाठी तो तिथे उभा राहिला. ('Slumdog Millionaire' fame Dev Patel put his life in danger for a stranger, saved the man who jumped in the knife)
अधिक वाचा : HAR GHAR TIRANGA Anthem : अमिताभ बच्चन, विराट कोहली, 'हर घर तिरंगा' गाण्याच्या व्हिडिओ - पहा संपूर्ण गाणे
देव पटेल हा ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे राहतो आणि मंगळवारी 2 ऑगस्ट रोजी ही घटना तेथे घडली. देव पटेल हा त्याच्या काही मित्रांसह तेथील एका जनरल स्टोअरमध्ये सामान घेण्यासाठी गेले होते. तिथे जवळच एक कपल भांडत होते. हाणामारी इतकी वाढली की दोघांमध्ये चाकूने मारामारी सुरू झाली आणि महिलेने त्या व्यक्तीच्या छातीवर वार केले.
देव पटेल आणि त्याच्या मित्रांनी हे पाहिल्यावर त्यांनी लगेचच या जोडप्याच्या भांडणात उडी घेतली. देव पटेल यांनी जीव धोक्यात घालून त्या माणसाला वाचवले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी त्याला संरक्षण दिले. देव पटेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते अभिनेत्याचे कौतुक करताना थकत नाहीत. काही जण त्याला रियल लाइफ हिरो म्हणत आहेत तर काही त्याच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.