Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तीनं घेतला जगाचा निरोप

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 22, 2022 | 10:58 IST

Sonalee Kulkarni Sad Post: सोनाली कुलकर्णीच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. या व्यक्तीच्या निधनाची बातमी सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Sonalee Kulkarni
सोनाली कुलकर्णीवर दुःखाचा डोंगर 
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonalee Kulkarni) गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
  • सोनाली कुलकर्णीचा लग्न सोहळा (wedding ceremony) प्लॅनेट मराठीवर (Planet Marathi) रिलीज झाला आहे.
  • मात्र आता अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुणे:  Actress Sonalee Kulkarni's grandmother passes away: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonalee Kulkarni)  गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सोनाली कुलकर्णीचा लग्न सोहळा (wedding ceremony)  प्लॅनेट मराठीवर (Planet Marathi) रिलीज झाला आहे. मात्र आता अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली कुलकर्णीच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. या व्यक्तीच्या निधनाची बातमी सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट लिहिताना सोनाली भावूक झाली आहे. 

सोनाली कुलकर्णीची सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे तिची आजी. सोनालीची आजी सुशीला कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. रविवारी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. 

अधिक वाचा-  'या' 3 राशींच्या सोनेरी दिवसांना सुरूवात, चालून येतील अनेक संधी

सोनाली कुलकर्णीनं तिचं सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर आजीसोबतचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सोनालीनं लिहिलं की, 'आजी तू आमच्यात असशील.. आम्ही असे पर्यंत'.सोनालीनं या व्हिडिओत आजीसोबतचे गोड क्षण शेअर केले आहेत. सोनालीच्या या पोस्टवर यूजर्स आजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. 

सोनालीचं लंडनमध्ये Grand Wedding

सोनाली आणि कुणालच्या ( Kunal Benodekar )  भव्य लग्नसोहळा  ( Sonalee and Kunal wedding story) प्लॅनेट मराठीवर रिलीज झालेला आहे. सोनाली कुलकर्णीचं लग्न लंडनमध्ये झालं. काही मोजकेच नातेवाईक आणि  मित्रपरिवारासमोर सोनालीचं लग्न झालं. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा ओटीटीवर दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे.  11 ऑगस्टला हा लग्नसोहळा मालिकेच्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. सोनाली-कुणाल वेडिंग स्टोरी ही 3 भागांची मालिका प्लॅनेट मराठी ओटीटीवर आली आहे.

आयुष्यातील या सुंदर क्षणांबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, “ आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं, हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. माझंही होतं. मात्र, कोरोनामुळे मी आणि कुणालने रजिस्टर लग्न केलं. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आलं नाही. त्यामुळे आता सारं काही रुळावर येत असताना जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आम्ही पुन्हा एकदा लग्न केलं.पारंपरिक पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडला. रिसेप्शनही केलं. कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे,  म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवलं आणि आता प्रेक्षक माझा हा लग्नसोहळा आपला समजून पाहू शकतील याचा आनंद आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी