मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता सुर्या, त्याची पत्नी ज्योतिका आणि 'जय भीम' चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. रुद्र वन्नियार सेना नावाच्या वन्नियार गटाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सईदापेट न्यायालयाने वन्नियार ग्रुपच्या तक्रारीवरून चेन्नई पोलिसांना त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. (South Star in trouble due to Jai Bhim! Why FIR will be filed against actor Surya)
अधिक वाचा : Malayaka Arora: अर्जुन सोबतच्या नात्याबद्दल मलायकाचा हटके संवाद; म्हणाली, आम्ही रोज करतो रोमान्स
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुद्र वन्नियार सेनेने याचिकेत म्हटले होते की, जय भीममधील अनेक दृश्ये अशा प्रकारे दाखवण्यात आली आहेत की वन्नियार समाजाची प्रतिमा खराब होत आहे. तुम्हाला सांगतो की, या समुदायाने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीही त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
अधिक वाचा : इट्स अ रॅप! म्हणत मधूर भांडारकरांनी शेअर केली आनंदाची बातमी
वन्नियार समुदायाच्या गटाने चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकावीत असे सांगून चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली. यासोबतच त्यांनी जय भीमच्या टीमकडून 5 कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि बिनशर्त माफी मागितली होती.
अधिक वाचा : Anek Trailer: कैसे साबित होता है हम सिर्फ इंडियन हैं? आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' ने प्रश्न उपस्थित
हिंदी भाषेवर गदारोळ
जय भीम हे इरुलर समुदायाच्या सदस्यांच्या कस्टडील छळावर आधारित आहे. या चित्रपटातील एका दृश्यात प्रकाश राज एका व्यक्तीला हिंदीत बोलल्याबद्दल थप्पड मारताना दिसत होते. या दृश्यावरही बराच गदारोळ झाला होता. या चित्रपटाला ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते.