श्रीलंका बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावली 'ही' अभिनेत्री

झगमगाट
Updated Apr 22, 2019 | 07:59 IST | टाइम्स नाऊ हिंदी

श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या बॉम्बस्फोटात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात भारतीय अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे.

south indian actress radhika sarathkumar escape colombo blast
अभिनेत्री राधिका शरतकुमार 

मुंबई: श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २१५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर ४०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, या बॉम्बस्फोटातून दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका शरतकुमार या थोडक्यात बचावल्या आहेत. राधिका यांच्या मते, त्या हॉटेल सिनामोन येथे वास्तव्यास होत्या आणि याच हॉटेलमध्ये एक बॉम्बस्फोट झाला. अभिनेत्री राधिका यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

रविवारी श्रीलंकेत विविध ठिकाणी असे आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात चर्च आणि हॉटेल्सला लक्ष करण्यात आलं. अभिनेत्री राधिका यांनी आपल्या ट्विटरवर लिहिलं आहे की, 'अरे देवा श्रीलंकेत बॉम्बस्फोट, देवा सर्वांची मदत कर. बॉम्बस्फोट होण्याच्या काही वेळापूर्वीच मी कोलंबोतील सिनामोन ग्रँड हॉटेलमधून चेक आऊट केलं होतं. मला अद्यापही विश्वास बसत नाहीये. हे खूपच धक्कादायक आहे'.

कोण आहे अभिनेत्री राधिका शरतकुमार?

अभिनेत्री राधिका यांनी ३०० हून अधिक तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांत अभिनय केला आहे. यासोबतच त्यांनी दक्षिणात्य टीव्ही सीरिअल्समध्ये सुद्धा काम केलं आहे. राधिका यांनी चिट्टी, अन्नामलाई, सेलवी, थमाराई, अरासी, चेल्लमे, वानी रानी सारख्या टीव्ही मालिका प्रोड्यूस केल्या आहेत.

अभिनेत्री राधिका यांनी हिम्मतवाला, आज का अर्जुन, लाल बादशाह, हम तुम्हारे, असली नकली सारख्या सिनेमांत अभिनय केला आहे. १९९० साली आलेल्या आज का अर्जुन या सिनेमात राधिका यांना फिल्मफेयर बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री म्हमून नामांकित करण्यात आलं होतं.

तीन भारतीयांचा मृत्यू

कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. सुषमा स्वराज यांनी म्हटलं की, श्रीलंकेत आठ बॉम्बस्फोट झाले. कोलंबो येथील भारतीय दुतावासाच्या आम्ही संपर्कात आहोत. या दुर्घटनेत तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला देण्यात आली आहे. लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी मृतकांची नावे आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
श्रीलंका बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावली 'ही' अभिनेत्री Description: श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या बॉम्बस्फोटात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात भारतीय अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे.
Loading...
Loading...
Loading...