Brahmastra Box Office Collection: 12 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर गडगडला ब्रह्मास्त्र; जाणून घ्या किती केलं कलेक्शन

झगमगाट
Pooja Vichare
Updated Sep 21, 2022 | 10:36 IST

Brahmastra Box Office Collection: रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. 12व्या दिवशी चित्रपटाची कमाई जाणून घ्या.

Brahmastra Box Office Collection Day 12
ब्रह्मास्त्रचे कलेक्शन 
थोडं पण कामाचं
 • ब्रह्मास्त्र (Brahmastra) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे आणि या सिनेमानं रिलीजनंतर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.
 • सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 36.42 कोटी रुपयांची कमाई केली
 • या वर्षी 'ब्रह्मास्त्र'ने फ्लॉप झालेल्या बॉलिवूड सिनेमांध्ये आशेचा किरण उभा केला.

मुंबई:  Brahmastra Box Office Collection Day 12:  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Bollywood actor Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) यांचा सिनेमा ब्रह्मास्त्र (Brahmastra) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे आणि या सिनेमानं रिलीजनंतर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 36.42 कोटी रुपयांची कमाई केली असून हिंदी भाषेतील कलेक्शन 32 कोटी रुपये आहे. या वर्षी 'ब्रह्मास्त्र'ने फ्लॉप झालेल्या बॉलिवूड सिनेमांध्ये आशेचा किरण उभा केला आणि अवघ्या 10 दिवसांत या सिनेमानं 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

12 व्या दिवशी सिनेमाची कमाई

या सिनेमाने सुरुवातीच्या आठवड्यात चांगली कमाई केली होती पण दुसऱ्या आठवड्यात त्याच्या कमाईत मोठी घसरण होताना दिसत आहे. 12 व्या दिवशीही सिनेमाची कमाई खूपच कमी होती आणि त्याने सुमारे 4.20 कोटी रुपये कमावले, त्यानंतर त्याची एकूण कमाई 224.10 कोटी रुपयांवर गेली आहे. यापूर्वी सोमवारी या सिनेमाने 4.65 कोटींची कमाई केली होती.

अधिक वाचा- फॅमिली फोटो शेअर करत सोनमनं दाखवली बाळाची पहिली झलक

सिनेमाची 11व्या दिवसाची कमाई

या सिनेमानं 11व्या दिवशी म्हणजे सोमवारी फारच कमी कमाई केली. रिपोर्ट्सनुसार, सोमवारी त्याची कमाई फक्त 4.80 कोटी रुपये होती. त्यानंतर त्याची एकूण कमाई 220 कोटींवर गेली आहे. सोमवारची कमाई रविवारच्या तुलनेत खूपच कमी होती. रविवारी सिनेमानं 16.05 कोटींची कमाई केली. सिनेमाच्या कमाईत घट झाल्यानं निर्मात्यांचा त्रास वाढू शकतो कारण हा सिनेमा 400 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

10 व्या दिवसाची कमाई

प्रदर्शनाच्या 9 व्या दिवशी 200 कोटीच्या क्लबमध्ये जाणारा ब्रह्मास्त्र सिनेमाने 10व्या दिवशी म्हणजेच रविवारी चांगली कमाई केली आहे. रविवारी केलेल्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, सिनेमाने 16.30 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हिंदीमध्ये त्याची कमाई सुमारे 15.50 कोटी रुपये होती, त्यानंतर सिनेमाचे एकूण कलेक्शन 215 कोटी रुपये झाले आहे. याआधी शनिवारी या सिनेमाने एकूण 15.38 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते, तर हिंदीमध्ये 14.7 कोटी रुपयांची कमाई केली होती.

आतापर्यंतचा कलेक्शन 

 • शुक्रवार- 36.42 कोटी
 • शनिवार- 42.41 कोटी
 • रविवार- 45.66 कोटी
 • सोमवार- 16.5 कोटी
 • मंगळवार- 14.00 कोटी
 • बुधवार- 11 कोटी 
 • गुरुवार- 9 कोटी
 • शुक्रवार- 10 कोटी 
 • शनिवार- 14.7 कोटी 
 • रविवार- 15.3 कोटी
 • सोमवार- 4.65 कोटी 

या देशांमध्येही चांगली कामगिरी

हा सिनेमा देशभरात 5019 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. तर इतर देशांमध्ये तो 3894 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. ब्रह्मास्त्रला एकूण 8913 स्क्रीन मिळाले आहेत. 400 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ब्रह्मास्त्र हा सिनेमा हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला. हिंदी बेल्ट, तेलुगू केंद्र तसेच यूएस, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये याने चांगली कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी