Suniel Shetty ने जावई केएल राहुलला दिल्या मॅरेज टिप्स, म्हणाला Your Are My Love

झगमगाट
Updated Mar 24, 2023 | 12:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Suniel Shetty Advise To KL Rahul: अभिनेता सुनील शेट्टीने अलीकडेच त्याचा जावई केएल राहुलला लग्नााबाबत एक खास सल्ला दिला. सुनीलने पत्नी माना शेट्टीसोबतच्या त्याच्या लग्नाच्या प्रवासाबद्दल सांगितले. अथिया शेट्टी आि क्रिकेटर केएल राहुल यांनासुद्धा लग्नानंतर कसं रहावं याबाबत सल्ला दिला.

सुनील शेट्टीने अथिया आणि राहुलला लग्नाबाबत खास सल्ला दिला
Suniel Shetty Advise To KL Rahul  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तानिया श्रॉफ आणि केएल राहुलचे कौतुक
  • सुनील शेट्टीने अथिया आणि राहुलला लग्नाबाबत खास सल्ला दिला
  • अहान शेट्टी सध्या तानियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे

Suniel Shetty Advise To KL Rahul: अभिनेता सुनील शेट्टीने अलीकडेच त्याचा जावई केएल राहुलला लग्नााबाबत एक खास सल्ला दिला. सुनीलने पत्नी माना शेट्टीसोबतच्या त्याच्या लग्नाच्या प्रवासाबद्दल सांगितले. अथिया शेट्टी आि क्रिकेटर केएल राहुल यांनासुद्धा लग्नानंतर कसं रहावं याबाबत सल्ला दिला. सुनीलने त्याचा मुलगा अहान शेट्टीची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ आणि केएल राहुल यांचे कौतुकही केले आणि त्यांना 'माय लव्ह' म्हटले. (Suniel Shetty gave marriage tips to son-in-law KL Rahul)

सुनीलने 1991 मध्ये मानासोबत लग्न केले. त्याला दोन मुलं आहेत - मुलगी अथिया आणि मुलगा अहान. अथिया शेट्टीचा जन्म 1992 मध्ये झाला होता. अहान शेट्टी सध्या तानियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि अथियाने या वर्षाच्या सुरुवातीला केएल राहुलसोबत लग्न केले.

अधिक वाचा: 3 फ्लॉप देऊनही Ranveer Singh हिट, ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीला टाकले मागे

एकमेकांवर विश्वास महत्वाचा 

सुनील शेट्टीने अथिया आणि केएल राहुलला लग्नाबाबत एक खास सल्ला दिला. तो उपदेश कोणता होता हे त्याने आता उघड केले आहे. "नात्यात एकमेकांवर विश्वास ठेवणे, एकमेकांना स्पेस देणे, नेहमी एकमेकांसाठी उभे राहणे खूप महत्वाचे आहे. मी मानासोबत नेहमी असाच वागलो, मी नेहमी तिला सपोर्ट केला, आजही मी तिचा हात तेवढ्यात प्रेमाने आणि विश्वासाने हातात घेतो. अथिया मला कधी कधी विचारते, 'तुझा जोडीदार कुठे आहे?' मी एकटाच कधी तिच्या घरी गेलो आणि तिची आई माझ्या सोबत नसली तर ती विचारते, 'तुझा दुसरा हात कुठे आहे?' कारण आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. हे आमच्या मुलांनाही माहित आहे, म्हणून तुम्ही देखील असेल एकमाकांवर प्रेम करत रहा," असा सल्ला सुनिल शेट्टीने जावई केएल राहूलला दिला.

अधिक वाचा:  Aamir Khan Fitness Secret अमीर खान 58 व्या वर्षी देखील दिसतो इतका तरुण ! या दोन गोष्टीत लपले आहे गुपीत

लग्नाचे रिसेप्शन आयपीएलच्या सीझननंतर

अथियाने 23 जानेवारी 2023 रोजी लोणावळ्यातील सुनीलच्या फार्महाऊसवर केएल राहुलसोबत लग्न केले. लग्नानंतर सुनीलने फोटोग्राफर्सशी संवाद साधला आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आभार मानले. लग्नाचे रिसेप्शन आयपीएलच्या सीझननंतर होणार असल्याचा खुलासाही सुनीलने केला आहे. सध्या सुनील आगामी अॅक्शन-थ्रिलर वेब सिरीज 'हंटर' मध्ये दिसणार आहे. जी 22 मार्चपासून Amazon Mini TV वर स्ट्रीम करण्यात आली आहे. प्रिन्स धीमान आणि आलोक बत्रा दिग्दर्शित, यात ईशा देओल, राहुल देव, बरखा बिश्त, मिहिर आहुजा, टीना सिंग यांच्याही भूमिका आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी