Sunny Leone: पंतप्रधान मोदींना मागे टाकत सनी लिओनी ठरली गुगल सर्चमध्ये अव्वल

झगमगाट
Updated Aug 13, 2019 | 16:53 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Sunny Leone: गुगलच्या सर्च लिस्टमध्ये सनी लिओनी कायम आघाडीवर असते. भारतातील सर्च लिस्टमध्ये सलमान खान, शाहरूख खान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकत सध्या सनी पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

PM Narendra Modi and Sunny Leone
सनी लिओनीनं पंतप्रधान मोदींनाही टाकलं मागे  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सनी लिओनीने पंतप्रधान मोदींनाही टाकले मागे; शाहरूख, सलमान खानही पिछाडीवरच
  • भारतातून गुगलवर सनी लिओनी केली जाते सर्वाधिक सर्च; ईशान्येकडील राज्यांमधून सर्च
  • ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सनी पहिल्या स्थानावर; सनीने चाहत्यांना दिले श्रेय

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते जगभरात आहे. पण, भारतात तिच्या चाहत्यांची संख्या थोडी जास्तच आहे. कारण, गुगलच्या सर्च लिस्टमध्ये ती कायम आघाडीवर असते. भारतातील सर्च लिस्टमध्ये सलमान खान, शाहरूख खान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश असतोच. पण, या सगळ्यांना सनीने मागे टाकले आहे. सध्या सनी सर्च लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर गेली आहे. देशातील सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या लिस्टमध्ये आघाडीवर होते. पण, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून चित्र सनीच्या बाजूने दिसत आहे. तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, सलमान, शाहरूख या सगळ्यांना मागं टाकून जणू आपली लोकप्रियताच सिद्ध केली आहे. या सर्चमध्ये प्रामुख्याने तिचा फोटो, तिचे व्हिडिओ आणि तिच्या बायोपिकची माहिती सर्च केली जाते, असं गुगल ट्रेंड्स अॅनालिटिक्सवरून दिसत आहे. अॅनालिटिक्सनुसार सनीचे चाहते उत्तर भारतात आणि विशेषकडून ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वाधिक आहेत. कारण, तिच्या नावाचे सर्च त्या भागातूनच सर्वाधिक असल्याचं दिसून आलंय.

Good night everyone!! Xoxo

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

Mood ?

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

चाहत्यांना वेब सीरिजही आवडली

'करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' या सनीच्या बायोपिकवरून खूप मोठा वाद उफाळून आला होता. झी-फाइव्ह वर हा बायोपिक रिलिज करण्यात आला. तीन सीझनमध्ये झालेल्या या वेबसीरिजमध्ये २० एपिसोड झाले होते. त्यात पहिल्या सीझनमध्ये दहा, दुसऱ्यात सहा आणि तिसऱ्या सिझनमध्ये चार एपिसोड झाले. फ्लाईट टू इंडिया हा तिसऱ्या सीझनच्या सीरिजचा शेवटचा एपिसोड होता. हिंदी आणि इंग्रजी बरोबरच, बंगाली, तेलुगू, तामिळ, मराठी आणि कन्नड भाषेत ही वेबसीरिज रिलीज करण्यात आली. त्यालाही सनीच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला असून, चाहत्यांना आता चौथ्या सीझनची उत्सुकता लागली आहे.

Is it Raining ??? Didn’t notice ? #SunnyLeone #MumbaiRains ⛈️

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

भारतातील संघर्ष

सनी लिओनीला भारतात आल्यानंतर खूप मोठा संघर्ष करावा लागला. राहायला घर मिळण्यापासून सिनेमा जाहिरातींमध्ये काम मिळण्यासाठी तिला धडपड करावी लागली. सनीनं काही सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी तिला जाहिराती मिळत नाही. त्यामुळं तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाहिरातींसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सध्या तिच्या अकाऊंटला २४७ लाख फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या अकाऊंटच्या माध्यमातून सनी सध्या अनेक कॉस्मेटिक्स उत्पादनांच्या जाहिराती करत आहे.

सनी काय म्हणाली?

सनी लिओनी कायमच आपल्या चाहत्यांचे आभार मानत असते. सर्च लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचल्यानंतरही तिनं याचं श्रेय चाहत्यांना दिलंय. याबाबत प्रतिक्रिया देताना सनी म्हणाली, ‘माझ्या टीमने नुकतीच मला याची माहिती दिली. याचे श्रेय पूर्णपणे मी चाहत्यांना देते. माझे फॅन्स नेहमीच माझ्या पाठिशी उभे राहतात. ही भावना खूप मोठी आहे.’ विशेष म्हणजे गेल्या वर्षीही सनी सर्च लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Sunny Leone: पंतप्रधान मोदींना मागे टाकत सनी लिओनी ठरली गुगल सर्चमध्ये अव्वल Description: Sunny Leone: गुगलच्या सर्च लिस्टमध्ये सनी लिओनी कायम आघाडीवर असते. भारतातील सर्च लिस्टमध्ये सलमान खान, शाहरूख खान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकत सध्या सनी पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली