Supriya Sule Gujarati: सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींसाठी स्पेशल भाषा, चक्क गुजरातीत साधला संवाद

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 27, 2022 | 18:17 IST

Supriya Sule In Zee Marathi Bas Bai Bas: झी मराठीवर (Zee Marathi) लवकरच बस आई बस (Bas Bai Bas) हा नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे.

Supriya sule
सुप्रिया सुळे 
थोडं पण कामाचं
  • झी मराठीवर (Zee Marathi) लवकरच बस आई बस (Bas Bai Bas) हा नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे.
  • येत्या 29 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
  • या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) प्रमुख पाहुण्या म्हणून दिसणार आहेत.

मुंबई: zee marathi bas bai bas Supriya sule: झी मराठीवर (Zee Marathi)  लवकरच बस आई बस (Bas Bai Bas) हा नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे. येत्या 29 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) प्रमुख पाहुण्या म्हणून दिसणार आहेत. या कार्यक्रमाचं अँकरिंग अभिनेता सुबोध भावे (Actor Subodh Bhave) करणार आहेत. यावेळी सुबोध भावे यांनी कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्यासोबत संवाद साधला आहे. या कार्यक्रमातल्या एपिसोडचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. या व्हिडिओत सुप्रिया सुळे चक्क गुजराती बोलताना बघायला मिळत आहेत. 

सुबोध भावेंनी या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंसोबत एक खेळ खेळला. या खेळात विविध नेत्यांचे फोटो सुप्रिया सुळेंना दाखवण्यात आले. ते फोटो बघून सुळे यांना त्या नेत्यांशी संवाद साधण्यास सांगितलं. या खेळादरम्यान सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवण्यात आला. हा फोटो दाखवताच सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत गुजराती भाषेत संवाद साधण्यास सुरूवात केली. या कार्यक्रमाच्या प्रोमोचा व्हिडिओ झी मराठीनं शेअर केला आहे. सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान मोदींचा फोटो दाखवल्यानंतर दुसरा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखवण्यात आला आहे. 

अधिक वाचा-  क्षुल्लक कारणानं ओरडले वडील, रागावलेल्या 9 वी तल्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल

सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत साधलेला गुजराती संवाद मराठीतून

नमस्कार मोदीजी कसे आहात तुम्ही…

मी गुजरातला जाऊन आले. तिथे सगळं ठिक आहे. गुजरात खूप सुंदर आहे. तिथे मला दर्शनाबेन भेटल्या. त्यांनी मला सुरतला गेल्यावर फाफडाही खायला दिला. मी सुरतलाही गेले होते. तिकडे काही आमदारही होते. ते रेडिसन्स हॉटेलमध्ये थांबलेत याची मला काही माहितीच नव्हती.

अमित शाह पण तिथे होते. ते रोज संसदेत येतात. ते मस्त भाषण करतात. पण तुम्ही संसदेत येत नाहीत. तुम्ही या ना, फार छान वाटेल आम्हा सर्वांना. तुम्ही या आणि माझं भाषण ऐका, मला फार आवडेल. मी गुजराती भाषा बोलायला थोडं थोडं शिकत आहे. मी थोडं गुजराती, थोडं मराठीत बोलते.

गुजरातचे आणि महाराष्ट्राचे संबंध मोरारजी भाईंच्या काळापासून चांगले आहेत. आपली पहिली भेट झाली तेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता. तेव्हा मी, तुम्ही आणि अनुराग ठाकूर आपण मॅच पाहायला गेलो होतो. तुम्ही या पुन्हा आपण मॅच पाहायला जाऊ, फार मजा येईल. तुम्ही पंतप्रधान आहात, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे मला कल्पना आहे. चला मी निघते.


सुबोध भावे यांचा बस बाई बस हा कार्यक्रम येत्या 29 जुलैपासून प्रक्षेपित होणार आहे. हा कार्यक्रम खास स्त्रियांसाठी असणार आहे. या कार्यक्रमात सुबोध भावे स्त्रियांसाठी राखीव अशी लेडीज स्पेशल बसचं नेतृत्त्व करताना दिसतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी