Swapnil Joshi: अभिज्ञा भावेचं 'हे' आहे Top Secret,स्वप्निल जोशीनं नक्कल करत शेअर केला व्हिडिओ

झगमगाट
पूजा विचारे
Updated Aug 02, 2022 | 17:10 IST

Abhidnya bhave Top Secret: एक भन्नाट धमाल गोष्टीचा व्हिडिओ स्वप्निलनं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत स्वप्निलनं सहकलाकार अभिनेत्री अभिज्ञा भावेविषयी एक सीक्रेट शेअर केलं आहे.

Abhidnya bhave
अभिज्ञा भावे  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सध्या झी मराठीवरील (Zee Marathi) तू तेव्हा तशी (Tu Tevha Tashi) ही मालिका खूप प्रसिद्ध आहे.
  • स्वप्निल जोशी (Swapnil Joshi)आणि शिल्पा तुळसकर यांच्या केमिस्ट्रीला लोकांनी चांगली पसंती दिली.
  • सेटवरील भन्नाट गोष्टी नेहमीच स्वप्निल सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशीच एक भन्नाट धमाल गोष्टीचा व्हिडिओ स्वप्निलनं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

मुंबई: Tu Tevha Tashi Swapnil Joshi Shared Video: सध्या झी मराठीवरील (Zee Marathi) तू तेव्हा तशी (Tu Tevha Tashi)  ही मालिका खूप प्रसिद्ध आहे. स्वप्निल जोशी (Swapnil Joshi)आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulsakar) यांच्या केमिस्ट्रीला लोकांनी चांगली पसंती दिली. मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्निल जोशी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. स्वप्निल सौरभ नावाच्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारत आहे. स्वप्निल सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सेटवरील भन्नाट गोष्टी नेहमीच स्वप्निल सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशीच एक भन्नाट धमाल गोष्टीचा व्हिडिओ स्वप्निलनं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत स्वप्निलनं सहकलाकार अभिनेत्री अभिज्ञा भावेविषयी एक सीक्रेट शेअर केलं आहे. 

अभिनेता स्वप्निल जोशीनं त्याच्या इन्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यानं अभिनेत्री अभिज्ञा भावेविषयी मजेदार सीक्रेट शेअर केलं आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की,  स्वप्निलनं अभिज्ञा भावे कशी शिंकते याचं सीक्रेट प्रेक्षकांना सांगितलं आहे. 

व्हिडिओ शेअर करून स्वप्निल शांत बसला नाही तर त्यानं स्वप्निलनं अभिज्ञाची नक्कलही करुन दाखवली आहे. अभिज्ञा शिंकताना 'येस' असा आवाज करते. हा मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल देखील होत आहे. 

Swapnil joshi

स्वप्निल जोशी नेहमीच सेटवरचे अनेक भन्नाट फोटो, व्हिडिओ मजेदार किस्से सोशल मीडियावर शेअर करताना आपण पाहतो. स्वप्निल सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 1 मिलीयन हून फॉलोवर्स आहेत. त्यानं एखादी पोस्ट शेअर केल्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. 

अधिक वाचा- लांब सडक केसांसाठी सोपा घरगुती उपाय, एकदा करून बघाच

तू तेव्हा तशी या मालिकेला लोकांची चांगली पसंत मिळत आहे. या मालिकेतून स्वप्निल आणि शिल्पाची छान लव्ह स्टोरीची केमिस्ट्री बघायला मिळतेय. या मालिकेत अभिज्ञा भावेही आहे. तिच्या भूमिकेला ही लोकांनी पसंती दिली आहे. हे सगळेच कलाकार सोशल मीडियावर सेटवरील धम्माल मस्ती बरेचदा रिल शेअर करत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी