मुंबई: Taapsee Pannu Argument with paparazzi: तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही स्पष्टपणे बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिची ओळखच स्पष्टपणे आपलं मत मांडणारी अभिनेत्री अशी आहे. अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान या अभिनेत्रीचं पापाराझींसोबत (paparazzi) भांडण झालं आहे. तापसी पन्नू तिच्या आगामी 'दोबारा' (Dobara) या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. जेव्हा तापसी पन्नू मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये (Mumbai's Mithibai College) पोहोचली तेव्हा यावेळी पापाराझींनी तिला या कार्यक्रमासाठी उशीर झाल्याचं सांगितलं. त्यावर तापसीचा पारा भयंकर चढला आणि तिनं पापाराझींसोबत वाद घातला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं
तापसी तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात पोहोचली. या कार्यक्रमात पापाराझी देखील तापसीला कव्हर करण्यासाठी आले होते. व्हिडिओ पाहता, असे दिसते की पापाराझी बऱ्याच वेळापासून अभिनेत्रीची वाट पाहत होते. मात्र कदाचित ती त्यांना वेळ देऊ शकली नाही.
अधिक वाचा- आज 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार, कोण होणार मंत्री? ; वाचा येथे 'त्या' 18 जणांची नावं
व्हिडिओमध्ये तापसी असे बोलताना दिसतेय की, "तिथे मला तयार राहण्यास सांगितले आहे. तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात. तुम्ही असं बोलताय की मी तुम्हाला येथे बोलावलं. तुम्ही माझ्याशी नम्रपणे बोला. तुम्ही माझ्याशी नम्रपणे बोललात तर मी तुमच्याशी नम्रपणे बोलेनं. कॅमेरा माझ्यावर आहे. त्यामुळे फक्त माझी बाजू दिसत आहे. कॅमेरा तुमच्यावर असता तर तुम्हाला कळलं असतं तुम्ही कसं बोलत आहात. दरम्यान पापाराझी बोलत आहे की, आम्ही तुमच्याशी चांगल्यापणानेच बोललो आहे.
अभिनेत्री उशीरा पोहोचली?
जेव्हा तापसी पन्नू कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा ती थेट आत जात होती. यावर पापाराझीने सांगितले की, आम्ही गेल्या 2 तासांपासून तिची वाट पाहत आहे आणि तिला खूप उशीर झाला आहे. Papps ने तापसीला थोडा वेळ थांबून फोटो काढण्यास सांगितले कारण ते बराच वेळ तिची वाट पाहत होते.
''एक्टर नेहमीच चुकीचा असतो''
पापाराझीसोबत जेव्हा वाद वाढला. तेव्हा तापसी स्वतः प्रकरण शांत केलं आणि हात जोडून म्हणाली, तुम्ही बरोबर नेहमीच बरोबर असता अभिनेता नेहमीच चुकीचा असतो.