TMKOC : दया नंतर आता बबिताही सोडणार जेठालालची साथ? या शोची आली आहे ऑफर

सोनी सब टीव्ही वरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का ऊल्टा चश्मामधील बबिता म्हणजेच मूनमून दत्ता शो सोडणार आहे असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी दिशा वाकानीने शो ला राम राम केला होता. त्यानंतर तारक मेहताची भूमिका करणारे शैलेश लोढासुद्धा शो मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा होत्या. आता प्रेक्षकांची फेवरेट कॅरेक्टर बबितापण शो सोडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

mummun dutta
मूनमून दत्ता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोनी सब टीव्ही वरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का ऊल्टा चश्मामधील बबिता म्हणजेच मूनमून दत्ता शो सोडणार आहे असे सांगण्यात येत आहे.
  • यापूर्वी दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी दिशा वाकानीने शो ला राम राम केला होता.
  • त्यानंतर तारक मेहताची भूमिका करणारे शैलेश लोढासुद्धा शो मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा होत्या.

Munmun Dutta : मुंबई : सोनी सब टीव्ही वरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का ऊल्टा चश्मामधील बबिता म्हणजेच मूनमून दत्ता शो सोडणार आहे असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी दयाबेनची व्यक्तिरेखा साकारणारी दिशा वाकानीने शो ला राम राम केला होता. त्यानंतर तारक मेहताची भूमिका करणारे शैलेश लोढासुद्धा शो मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा होत्या. आता प्रेक्षकांची फेवरेट कॅरेक्टर बबितापण शो सोडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. (taarak mehta ka ooltah chashmah fame babita munmu dutta may left show for big boss ott reality show )

मुनमून दत्ता शो सोडणार की नाही यावरून त्यांनी कुठलेही भाष्य केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार मुनमून दत्ता आगामी बिगबॉस ओटीटी या शोमध्ये सामील होणार आहे असे सांगण्यात येत आहे. यामुळेच मुनमून दत्ता तारक मेहता का उल्टा चश्मा सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु शोच्या निर्मात्यांकडून याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  


या पूर्वी बिग बॉस १५ मध्ये मूनमुन दत्ता शो मधील कंटेस्टट्सच्या चँलेजर बनून आली होती. मुनमून दत्ता या शोसाठी २ दिवस राहिली होती. तिच्यासोबत सुरभि चंदना, विशाल सिंह आणि आंकाक्षा पुरी ही होत्या. आता मुनमून दत्ता बिग बॉस ओटीटी स्पर्धक म्हणून सामील होणार आहे. 

मुनमून दत्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी मुनमूनने फेसबुक लाईव्ह करताना एका जातीबद्दल अपशब्द काढला होता. त्यानंतर खुप वाद झाला होता. अखेर मुनमूनने माफी मागितल्यानंतर हा वाद शमला होता. तसेच मुनमून आणि सध्या टपूची भूमिका करणारा राज यांचे डिनर करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. दोघांमध्ये काही तरी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर मुनमूनने एक पोस्ट लिहून अशा प्रकारे बातम्या पसरवणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.  मुनमून दत्ता शो सोडणार अशा प्रकरच्या बातम्या समोर आल्या होत्या, परंतु या सगळ्या अफवा असल्याचे मुनमूनमे म्हटले होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी